Voting Cards
Voting CardsSarkarnama

Pune By-Election : ऐकलं का मतदारराजा; 'ही' १२ ओळखपत्रे असतील तरच मतदान करता येणार

Voting Card: मतदानाला जाण्याआधी ओळखपत्रे सोबत असतील तरच मतदान करता येणार आहे.

Kasaba-Chinchwad By Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात हालचालीही सुरु झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांनी ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र, पारपत्र म्हणजे पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसह १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाप्रशासनाने या पुराव्यांची यादी जारी केली आहे. यातील कोणताही एक पुरावा असेल तर मतदाराला मतदान करता येणार आहेत.

Voting Cards
Pune By-Election: पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

ही ओळखपत्रे असतील तरच मतदान करता येणार

दोन्ही मतदार संघातील मतदारांनी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बॅंक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्र असेलले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विना स्मार्टकार्ड, वाहन परवाना, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताच्या महानिबंधकांद्वारे जारी केलेले स्मार्टकार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्यशासन/केंद्रशासन, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारे केलेल्या छायाचित्रांसब सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांनी दिलेले अधिकृच ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यंगत्वाचे ओळखपत्र यांपैकी कोणताही एक पुरावा असेल तरच मतदान करता येणार आहे.

याशिवाय, मतदार यादीचा अनुक्रमांक माहिती करुन घेण्यासाठी मतदानाची तारीख आणि वेळ असलेली चिठ्ठी मतदाराला पुरवण्यात येईल. असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहनही जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले आहे.

Voting Cards
NCP-BJP Politics : फडणवीसांशी आमच्या गुप्त चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या विधानाने तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली. टिळक आणि जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या त्यांच्या या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणुक कधी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे आज देशातील इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात येणार होत्या. त्यातच निवडणूक आयोगाने आज कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या निवडणूकाही जाहीर केल्या आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com