NCP-BJP Politics : फडणवीसांशी आमच्या गुप्त चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या विधानाने तर्क-वितर्कांना उधाण!

NCP-BJP News: आम्ही एका मंचावर आलो, आता वेगवेगळ्या चर्चा होतील.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊसमधील मालमत्तेवर ईडीनं टाच आणली होती. आता न्यायिक प्राधिकरणानेही याला मान्याता दिल्यामुळे त्यांच्यामागे पुन्हा एकदा ईडीचा फेरा लागण्याची शक्यता आहे. असे असतानाच एका जाहिर कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्या एका विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

तर दुसरीकडे,विरोधकांकडून सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून इतर पक्षांतल्या लोकांना आपल्या पक्षात आणण्याचा आरोप भाजपावर केला जातो. त्यातच पटेलांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी गोंदियामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेलांनी फडणवीसांशी आपल्या गुप्त चर्चा होत असल्याचा उल्लेख केला.

Devendra Fadnavis
Pune By-Election : ऐकलं का मतदारराजा; 'ही' १२ ओळखपत्रे असतील तरच मतदान करता येणार

देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना पटेल म्हणाले की, फडणवीस आणि आम्ही एका मंचावर आलो, आता वेगवेगळ्या चर्चा होतील, मात्र त्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. राजकारणात बऱ्याच गोष्टी होत असतात. आमचं त्यांच्याशी खूप बोलणं होत असतं. गुप्त चर्चाही होत असतात. यामुळे बऱ्याच लोकांना त्रासही होऊ शकतो”, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीनं कारवाईचा बडगा उगारलेला असताना दोघेही एकाच एकाच व्यासपीठावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी ही पटेलांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. "मला खूप आनंद आहे प्रफुल्ल भाई, इथे आपण मला आमंत्रित केलत. आता आपण दोघे एका मंचावर आलो आहोत तर चर्चा तर होणारच. बात निकली है तो, तो दूर तक भी जायेगी, मात्र त्याची काळजी करण्याची आता आवश्यकता नाही, असे सूचक फडणवीसांनी वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. राज्याच्या राजकारणात आपण वैचारिक विरोधक आहोत, व्यक्तिगत आपला विरोध नसतो. निवडणुकीत कधी कधी आपण एकमेकांचा फार विरोध करतो. मात्र विरोध करतानाही एकमेकांसोबत आपण चहा पिऊ शकतो. आपण एका मंचावर आलो, आता वेगवेगळ्या चर्चा होतील, मात्र त्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे सूचकपणे म्हंटले आहे. यामुळे पटेल आणि फडणवीस यांच्या या वेगळ्या 'यारानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा घडताना, दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com