Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणी टीकेच्या भडीमारानंतर अखेर आमदार टिंगरे आले समोर; म्हणाले... !

MLA Sunil Tingre : वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात असून याबाबत वेळोवेळी आवाजही उठविला आहे. परंतु एखाद्या अपघाताशी काहीही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक असून सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत...
Mla Sunil Tingre
Mla Sunil TingreSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये पोलीस चौकीमध्ये जाऊन आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'एक्स' अकाउंटवरून टिंगरे त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवित दोन जणांना चिरडले, ही घटना दोन दिवसांपूर्वी शनिवारी पुण्यात घडली. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला तूर्तास जामीन मिळाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राजकीय दबावातून पोलिसांनी आरोपीला जामीन मिळावा, अशी कलमे जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप देखील करण्यात येत आहेत. अपघाताच्या मध्यरात्री वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील पोलीस चौकीमध्ये पोहोचल्यामुळे त्यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप होत आहे. यावर आता आमदार टिंगरे यांनी आपली बाजू मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mla Sunil Tingre
Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्या...

टिंगरे म्हणाले काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा आहे. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियावर काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती पसरविण्यात येत आहे. याकडे आपण सुरवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करत आहे.

वडगावशेरी या माझ्या मतदारसंघात हा मोठा अपघात झाल्याची माहिती शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मला मिळाली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनी देखील फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यामुळे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो.

यावेळी पोलिस (Police) चौकात माहिती घेतली असता पोलिस निरिक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला.

त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशा सूचना करून तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, हे पोलिस अधिकारीही कबुल करतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळेच रविवारी सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Mla Sunil Tingre
CP Amitesh kumar News : दोघांना चिरडले, आरोपीला जामीन झाला अन् राजकीय दबावाच्या आरोपावर अमितेशकुमार म्हणतात…!

दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून जाणीवपूर्वक सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून केला जात आहे. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडली आहे.

वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात असून याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. परंतु एखाद्या अपघाताशी काहीही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक असून सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे, असंही सुनील टिंगरे म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Mla Sunil Tingre
Pune hit And Run Case: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचे दिले आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com