Pune News : पुण्यात पोलीस स्टेशनमधूनच चालणारे जमीन विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वरिष्ठ निरीक्षकांवर गुन्हा दाखल

Pune News : पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानकातून चालणारे जमीन व्यवहाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानकातून चालणारे जमीन व्यवहाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, 2022-23 मध्ये वाघोली येथील 10 एकर जमीन हडपण्यासाठी लांडगे यांच्या नेतृत्वात कट रचण्यात आला. अर्चना पटेकर या महिलेला अर्पणा यशपाल वर्मा असे नाव धारण करायला सांगून तीच मूळ जागा मालक आहे, असे भासवण्यात आले. वर्मा हिच्या नावाचे बनावट दस्त नोंदणीसाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करुन जमिनीचे खरेदी खताचे दस्त तयार केले.

Pune Police News
Pune News : पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानकडून जीवाला धोका, धमकीचे फोन; काय आहे कारण?

हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे यांनी जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी केली असल्याचे समोर आले. यात पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाचाही संबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात आतापर्यंत आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा या चौघांवर चंदननगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police News
BJP Pune strategy : 'स्थानिक'साठी भाजपने रिस्क घेत पुण्यात नवा डाव टाकला; घाटेंना पुन्हा संधी देण्यामागे 'हे' आहे मोठे कारण

चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहेत. पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळणारे एकापेक्षा एक प्रकरण मागील काही दिवसांपासून बाहेर येत आहेत. यात अगदी पोर्श कार अपघात प्रकरणापासून ते गजा मारणेसोबत मटण पार्टी करण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. अशात पोलीस जमीन विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com