Pune News: भाजपच्या माजी नगरसेवकावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

BJP corporator Rajendra Shilimkar case filed: नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतन यांना मारहाण केल्याची तक्रारीत म्हटलं आहे.
Rajendra Shilimkar
Rajendra ShilimkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील भाजप माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. राजेंद्र शिळीमकर, मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर, महेश शिळीमकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चेतन आरडे यांनी याबाबत तक्रार दिली होती.

चेतन आरडे हे मातंग समाजातील असून तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहे. 20 जून 2024 रोजी सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ही आले होते.

मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांना ही आत जायचे होते. परंतु नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतन यांना मारहाण केल्याची तक्रारीत म्हटलं आहे.

Rajendra Shilimkar
NCP Politics: राष्ट्रवादी दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली; आमदारकीचे डोहाळे? वडिलांच्या नावावर राजकारणात...

याप्रकरणी चेतन आरडे यांनी 112 नंबर वर डायल करून पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पोलिस घटनास्थळी पोहचले नाही. यावेळी चेतन हे सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरडे यांचा कुठलाही प्रकारे जबाब व तक्रार घेतली नाही.

आरडे हे गेल्या पाच दिवसांपासून समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले आहेत. यावेळी मारहाण व शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून आपल्या जीवितास धोका आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती कायदा 1989 सुधारित 2016 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय द्यावा, असे आरडे यांनी लेखी पत्र पोलिसांना दिले आहे. त्यांच्या पत्राची दखल घेत पोलिसांनी शिळीमकर कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com