Pune Politics : मुक्ता टिळकांच्या मरणाची वाट पाहणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली; काँग्रेसचा घणाघात

Kasba By Election : महाविकास आघाडीच्यावतीने आज जाहीर सभेचे आयोजन केले होते.
Arvind Shinde and Hemant Rasane
Arvind Shinde and Hemant Rasane Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुक्ता टिळक या अडीच वर्ष आजारी होत्या. अनेकजण त्यांना भेटायला जात होते. पण भाजपातील काही इच्छुक टिळक यांच्या मरणाची गिधाडा सारखी वाट पाहत होती," अशी जहरी टीका पुणे शहर जिल्हा काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी आज प्रचारसभेत केली.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत आज कसबा पोटनिवडणुकीसाठी जाहीर सभेचे महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणात अरविंद शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Arvind Shinde and Hemant Rasane
Sharad Pawar News : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला

अरविंद शिंदे म्हणाले, ''मुक्ता टिळक अडीच वर्ष आजारी होत्या. अनेक जण त्यांना भेटायला जात होते. पण भाजपमधील काही इच्छुक त्यांच्या मरणाची गिधाडा सारखी वाट बघत होते. मुक्ताताईंनी केलेल्या विकासाचे काम हेच हेमंत रासने थांबवत होते. हे मी सांगत नाही तर मुक्ताताईंचे पती शैलेश टिळकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सागितलं आहे. मात्र, तरीही असा उमेदवार देता ज्याने मरण्याची वाट बघितली. यांना लाज वाटली पाहिजे'', असा घणाघात शिंदेंनी केला.

Arvind Shinde and Hemant Rasane
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून राज्यपाल पदावर बसले होते; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ते म्हणाले, ''हेमंत रासने सलग ४ वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. महापालिकेचे अंदाज पत्रक त्यांनी लागोपाठ चार वर्ष सादर केले. म्हणजे २८,००० कोटींचे अंदाजपत्रक हेमंत रासने यांनी सादर केले. त्यांच्या प्रभागात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण तिथे विकासाची कामे केले नाही. हा प्रश्न प्रत्येक मतदाराने उमेदवाराला विचारले पाहिजे.''

Arvind Shinde and Hemant Rasane
Nana Patole News : राहुल अन् प्रियंका गांधींबद्दल प्रश्‍न विचारताच नाना पटोलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

'सीआयडी, ईडी, आयकर विभाग, पोलीस हे कधीतरी हेमंत रासने यांच्या घरी पाठवा ना. ५०० कोटी रुपये काय केले?" असा सवाल त्यांनी भाषणात भाजपला विचारला.

तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, "महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील पीएमपीएलचे ऑफिस तोडून अधिकारी नसताना कॉम्प्युटरवर अॅक्सेस केलं होतं. पण आजपर्यंत त्यांच्यावर पोलीस करवाई झाली नाही.

त्यांनी २९८ कोटी रुपयांची माफी बस कॉन्ट्रॅक्टर यांना दिली. ज्यांनी कोविड काळात बसच चालवली नाही त्यांना आता कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रभारी केलं आहे'', असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com