Gokul News: अखेर माजी आमदार आप्पा महाडिकांनी सूत्रे फिरवली, आता गोकुळमध्ये बंटी पाटलांची अडचण होणार

Mahadev Mahadik Politics : सध्याची परिस्थिती पाहता महायुती म्हणून एकत्र लढायची झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची आहे. महायुतीचे पॅनेल झाल्यास आमदार पाटील हे एकाकी पडू शकतात. त्यामुळेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दोन दिवसापूर्वी समविचारी लोकांना एकत्र करण्याचा टाकलेला डाव हा कितपत यशस्वी ठरतो हे यावरूनच दिसणार आहे.
Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने महाडिक गटाची सत्ता गोकुळमधून उलथवून टाकण्यासाठी विरोधकांना एकत्र केले. त्याच पद्धतीने आता पाटील यांना शह देण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी सूत्रे हलवली आहेत. गोकुळमध्ये ज्यांनी पाटील यांना साथ दिली.

त्याच नेत्यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी केलेला प्रचार अडचणीत आणण्याची शक्यता आहे. अशा महायुतीच्या नेत्यांना वचपा काढण्याची संधी गोकुळच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच समविचारी लोकांना एकत्र घेण्याचा पहिला डाव माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी टाकला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावरील अध्यक्ष निवडीवरून झालेल्या राजकीय घोळामुळे आतापासूनच नेत्यांनी सावध बांधणी सुरू केली आहे. गोकुळ दूध संघामध्ये देखील महाविकास विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ठराव अधिक आहेत त्यांनाच हाताशी धरून तगडे पॅनेल करण्याची तयारी दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे.

एकीकडे आमदार सतेज पाटील (Satej Patil) तर दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे दोघे एकमेकांच्या विरोधात असले तरी मंत्री मुश्रीफ यांची अडचण सध्या तरी जे चित्र आहे. त्यामुळे सेंटर पॉइंटला मुश्रीफ असून आगामी निवडणुकीत ते कोणासोबत असणार हेच पाहावे लागणार आहे.

Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Vidarbha News: आमदार जोरगेवारांनी मुत्सद्दी मुनगंटीवारांशी पंगा घेतला खरा...,पण चंद्रपूर महापालिका वाटते तितकी सोपी नसणार!

गोकुळ दूध संघावरील संचालक मंडळाची मुदत एप्रिल 2026 मध्ये संपणार आहे. पूर्वी प्रारूप मतदारयादी प्रक्रिया डिसेंबर पासून सुरू होणार आहे. डिसेंबरपर्यंत गोकुळ दूध संघाची निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हेच गृहीत धरून वरिष्ठ नेत्यांकडून ठराव गोळा करण्याची बेरीज सुरू आहे. ज्याच्याकडे अधिक ठराव तो व्यक्ती घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रयत्नांची पारकाष्ठा आहे.

मागील निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के पी पाटील, ए वाय पाटील, हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होते.

Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Shivsena UBT News : 'क्या हुआ तेरा वादा' शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, स्टेअरिंग दानवेंच्या हाती!

पण सध्याची परिस्थिती पाहता महायुती म्हणून एकत्र लढायची झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची आहे. महायुतीचे पॅनेल झाल्यास आमदार पाटील हे एकाकी पडू शकतात. त्यामुळेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दोन दिवसापूर्वी समविचारी लोकांना एकत्र करण्याचा टाकलेला डाव हा कितपत यशस्वी ठरतो हे यावरूनच दिसणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के पी पाटील, ए वाय पाटील, आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, पी जी शिंदे, कर्ण सिंह गायकवाड, अरुण डोंगळे, रणजीत सिंह पाटील मुरगूडकर, अशोक चराटी,माजी मंत्री म्हणून भरमुअण्णा पाटील, माजी आमदार सुजित मीनचेकर हे सोबत असू शकतात.

Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Ravindra Dhangekar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश येताच धंगेकरांनी टाकला नवा बॉम्ब

तर आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहुल पाटील, संपतराव पवार, विश्वास पाटील, डॉ.चेतन नरके, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, मानसिंगराव गायकवाड, राहुल देसाई, सत्यजित जाधव, संध्यादेवी कुपेकर, गोपाळराव पाटील, अंजना रेडेकर मुकुंद देसाई,जयवंतराव शिंपी, गणपतराव पाटील हे सोबत असू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com