Pune Congress : पुणे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : बड्या नेत्यावर तिकीट विक्री अन् जमीन हडपल्याचा आरोप: थेट राहुल गांधींना लिहिलं पत्र

Amir Sheikh Allegations on Abhay Chhajed : प्रभाग २८ मध्ये काँग्रेसशी संबंध नसलेल्या व्यक्तीला तिकीट दिले त्या उमेदवाराने ३ लाख रुपये घेऊन निवडणूक सोडली आणि पळ काढला.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 12 Mar : मागील काही दिवसांपासून पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अशातच आता महापालिका निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या कोषाध्यक्षांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अमीर शेख यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी थेट राहुल गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड यांच्यावर आर्थिक घोटाळे, निवडणूक तिकीट विक्री आणि जमीन हडप केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी छाजेड यांचे तात्काळ निलंबन आणि पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील केली आहे.

अमीर शेख यांनी लिहलेल्या पत्रात अभय छाजेड यांनी वैयक्तिक फायद्यासाठी जमिनीचे गैरव्यवहार केले असल्याचे आरोप करण्यात आला आहे. तसेच यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करून मनसेचे राजू पवार आणि समाधान शिंदे यांना काँग्रेस तिकिटे विकली.

Pune Congress
Land scam : शिवसेना आमदाराने महसूल मंत्र्यांसमोरच उघड केलं तहसिलदाराचं 'कांड' : अवैध ठरवलेल्या जमिनीसाठी 160 कोटी मंजूर

हे लोक अद्याप अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सामील झालेले नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं सांगितलं आहे. तसेच प्रभाग ३५ (सिंहगड रोड) येथे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी ४ निष्ठावंतांची शिफारस केली, पण छाजेड यांनी तिकिटे अज्ञात व्यक्तीला विकले; त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल झाला नाही.

तर प्रभाग २८ मध्ये काँग्रेसशी संबंध नसलेल्या व्यक्तीला तिकीट दिले त्या उमेदवाराने ३ लाख रुपये घेऊन निवडणूक सोडली आणि पळ काढला. त्यामुळे अभय छाजेड यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण वैयक्तिक आंदोलन सुरू करणार असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Pune Congress
Iran Hormuz Strait : भारताच्या ऑईल डिप्लोमसीला सर्वोच्च यश! हजारो कोटींचा माल इराणच्या होर्मुझ खाडीतून सोडवला; पासवर्ड ठरला 'तिरंगा'

अभय छाजेड यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत याबाबत पुरावे द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यावर शेख यांनी आपण प्रदेशाध्यक्षांनी बोलावल्यानंतर पुरावे घेऊन त्यांना सादर करणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com