Murlidhar Mohol rescue : पुण्यातील जोडप्याचा थायलंडमध्ये गंभीर अपघात; मंत्री मोहोळांनी सारी ताकद लावली, थेट विमानातील खुर्च्या बदलल्या अन्...

Pune couple accident in Phuket : पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे राहणारी दोन दांपत्य पुण्याहून नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले होते. सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दांपत्याचा झोका घेताना अपघात झाला आणि त्या दोघांना गंभीर दुखापत झाली होती.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Mar : पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे राहणारी दोन दांपत्य पुण्याहून (Pune) नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले होते. सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दांपत्याचा झोका घेताना अपघात झाला आणि त्या दोघांना गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मिळताच त्यांनी या दांपत्याच्या पुढील उपचारांसाठी भारतात आणण्याची सोय केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फुकेत सहलीला गेलेले शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दोघेही एकत्र झोका खेळत असताना. झोका इतका उंच गेला, की त्या झोक्यावरून तोल गेला आणि जवळजवळ १० फूट उंचीवरून जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेत ताबडतोब 'पटाँग हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आलं.

Murlidhar Mohol
Ranjit Kasale Extortion Scandal : धनंजय मुंडेंवर आरोप करणारा रणजित कासले अडचणीत, एक कोटीची खंडणी मागतानाचा व्हिडिओ समोर

या अपघातात शुभम यांच्या मांडीचे हाड तर सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. तेथे त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आलं होतं. ऑपरेशनसाठी त्यांना तात्काळ देशात आणणं गरजेचं होतं. याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं, या घटनेची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाली आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आम्ही सर्व यंत्रणा कामाला लावली.

विमानाच्या खुर्चीत बसून जखमींना येणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर व्यवस्था गरज होती आणि त्यासाठी डॉक्टरपासून हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूप जास्त परवानग्या आवश्यक होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम करून स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या, या सगळ्याची पूर्तता करावी लागली.

Murlidhar Mohol
Cooperative Taxi Service : ओला, उबेरला टक्कर देण्यासाठी मोदी सरकारची 'सहकार टॅक्सी'; अमित शहांचा प्लॅन समजून घ्या...

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही या दांम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांनाही लवकरात लवकर भारतात आणायचे होते. अखेर या सर्व प्रयत्नांना यश आले. त्यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने आणलं. पुण्यात पोहोचताच त्यांच्यावर संचेती रुग्णालयात त्यांना ऑपरेशनसाठी दाखल केलं.

तर परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार माझ्याकडे आल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. म्हणूनच गरजूंना मदतीचा हात देणे, हे मी माझे कर्तव्य समजून सर्व यंत्रणा कामाला लावत असतो, शिवाय अशा प्रकारांमध्ये आमच्या सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणाने मदत करतात आणि त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होतो, असं मंत्री मोहोळ यांनी सांगितलं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com