Satish Wagh Murder Case : शेजारीच ठरला मारेकरी! भाजप आमदाराच्या मामाला संपवण्यासाठी दिली सुपारी, हत्येमागचं गुढ उकललं

Satish Wagh Kidnapping And Murdered Case : सतीश वाघ यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांची 16 पथके कामाला लागली आहेत. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या टेक्निकल डाटाच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Satish Wagh
Satish WaghSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Dec : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर उरळीकांचन येथील शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा युद्धपतळीवर तपास करण्यात आला.

अशातच आता पोलिसांनी (Police) या प्रकरणात 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसंच या हत्येमागचं गुढ उलगडण्यात देखील पोलिसांना यश आलं आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले.

यावेळी त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवलं आणि ते सोलापूरच्या (Solapur) दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी सायंकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. यावेळी त्यांच्या मृत देहावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचं दिसून आलं, तसंच त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडके देखील आढळून आले होते.

या दांडक्याच्या साह्यानेच वाघ यांच्या डोक्यावर आघात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर मारहाण केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून गुन्हेगार पसार झाले. अपहरण केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केल्याची शक्यता आहे. पोलिसांची 16 पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागली आहेत.

Satish Wagh
Ladki Bahin Yojana : भावांचे शपथविधी पार पडताच लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, 15 हजार अर्ज बाद

श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या टेक्निकल डाटाच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांच्या या शोध मोहिमेला यश आले असून या हत्ये प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चार आरोपींना ताब्यात घेतलं. यापैका दोघांची नावे पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी आहेत. दरम्यान, पोलिसांना वाघ यांचं अपहरण आणि हत्येमागचं नेमकं कारण देखील समजलं आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. अमितेश कुमार यांनी सांगितलं की, "या खुनाच्या गुन्ह्यामधील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच वाघ यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली असल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.

Satish Wagh
Prakash Ambedkar : संविधानाची विटंबना, प्रकाश आंबेडकर आक्रमक; म्हणाले ' परिणामास तयार...'

वैयक्तिक वादातून ही सुपारी देण्यात आल्याचंही समोर आला आहे. या संशयित आरोपीला अटक कली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अत्यंत वेगाने काम केलं तब्बल 450 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती.

या माध्यमातून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचा शोध घेऊन नंतर आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आलं आहे. तर पोलिसांकडून आता या प्रकरणाशी संबंधित ठोस पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. शिवाय ही हत्या करण्यासाठी ज्या शेजाऱ्याने 5 लाखाची सुपारी दिली होती त्याच्याबाबतची अधिकची माहिती गोळा करण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com