Pune Crime : पुण्यातील कोयता गँगचा होणार बंदोबस्त! गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले 'हे' पाऊल

New Plan by Pune Police : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले. पुण्यातील कोयता गँगच्या कारवाया तरीही संपताना दिसत नाहीत. त्यासाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला पुणे पोलिसांनी पाठवला होता.
Pune Crime : पुण्यातील कोयता गँगचा होणार बंदोबस्त! गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले 'हे' पाऊल
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. कोयता गँगची नवनवीन प्रकरणं रोज समोर येत आहेत. या पार्श्वभूमी वर वाढती लोकसंख्या पाहता पुणे शहरांमध्ये नव्याने पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे तसेच अतिरिक्त 1700 पोलीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी असा प्रस्ताव राज्य सरकारला पुणे पोलिसांनी पाठवला होता. राज्य सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून 7 पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 816 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना देखील मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

त्यानुसार आता भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वर्गीकरण करून आंबेगाव पोलिस स्टेशन करण्यास मंजूर देण्यात अली आहे. यासाठी राज्य शासनाने सात कोटी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पोलिस स्टेशनसाठी 98 पद मंजूर करण्यात आली आहे. त्यासोबतच हवेली आणि सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतील काही भाग वेगळा करून नांदेड सिटी पोलिस स्टेशन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 118 पदे मंजूर करण्यात आले आहे. या नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या निर्मितीसाठी 8.60 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. चतु:शृंगी पोलिस स्टेशन येणाऱ्या भौगोलिक भागाचे दोन भाग करून बाणेर पोलिस स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी 8.60 कोटींचा निधी आणि 118 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

Pune Crime : पुण्यातील कोयता गँगचा होणार बंदोबस्त! गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले 'हे' पाऊल
BRS Merger in Sharad Pawar NCP: BRS गाशा गुंडाळणार...; शरद पवारांच्या NCP मध्ये विलीन होणार?

त्यासोबतच चंदननगर पोलिस (Police) स्टेशन परिसरात येणाऱ्या भागाचे दोन भागात विभागणी करून खराडी पोलिस स्टेशन निर्माण करण्यात आले आहे. या स्टेशनसाठी 103 पद आणि साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हडपसर, कोंढवा आणि वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही भाग विभक्त करून काळेपडळ पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या पोलीस स्टेशनसाठी 140 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 10.24 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. हडपसर, लोणी काळभोर पोलिस स्टेशन मधील काही भाग एकत्रित करून फुरसुंगी पोलिस स्टेशन नव्याने निर्माण करण्यात येणार असून यासाठी 112 पदांना मंजुरी मिळाली असून 8.81 कोटी निधला मान्यता देण्यात आली आहे.

Pune Crime : पुण्यातील कोयता गँगचा होणार बंदोबस्त! गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले 'हे' पाऊल
Supriya Sule : 'आमचं आयुष्य उध्वस्त करून ते पक्ष, चिन्ह घेऊन गेले; सुप्रिया सुळेंचा कोणावर राग?

लोणीकंद पोलिस स्टेशन परिसरात येणाऱ्या भागातून वाघोली पोलिस स्टेशन नव्याने निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 118 पदांना मंजुरी देण्यात आली असून 8.75 कोटी निधीला मजुरी देण्यात आली आहे. त्यासोबतच पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनसाठी नवीन इमारत उभारण्यास मंजुरी मिळाली असून त्याकरीता 25 कोटी रुपये मंजूर झालेला आहेत.

याबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले, ही सर्व पोलिस स्टेशन एकाच वेळी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वेळ घेऊन सदर कार्यक्रम आचारसंहितेपूर्वी करण्यात येणार आहे. संबंधित सात पोलीस स्टेशनसाठी नव्याने इमारत शोधण्यात येत आहे. सध्याच्या मनुष्यबळाचा वापर या पोलिस स्टेशनसाठी करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com