Dinanath Hospital : गर्भवतीचा जीव गेल्यानंतर दीनानाथ रुग्णालयाचे प्रशासन 'ताळ्यावर'; इमर्जन्सी पेशंटसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय

Tanishaa Bhise death case : पुण्यातील नामांकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पैशाअभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपाचार न केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप या रूग्णालयावर केला जात आहे.
Dinanath Hospital
Dinanath HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Apr : पुण्यातील (Pune) नामांकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पैशाअभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपाचार न केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप या रूग्णालयावर केला जात आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे यांच्या कुटंबियांकडे १० लाखांच्या अनामत रकमेची मागणी केली. पैसे दिल्यानंतरच गर्भवती महिलेवर उपाचर केले जातील, असं रूग्णालयाने सांगितल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. मात्र, वेळेत उपचार न झाल्यामुळे अखेर तनिषा भिसे यांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेमुळे राज्यभरातून दीनानाथ रुग्णालयावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय काल पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करत तोडफोड केली. यावेळी काही आंदोलकांनी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाच्या बोर्डला काळं फासलं. या घटनेनंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी एक पत्रक जारी करत मोठा निर्णय घेतला आहे.

केळकर यांनी आता इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेतली जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय या दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शरमेने खाली गेल्याचंही केळकर यांनी म्हटलं आहे. तसंच डॉ. धनंजय केळकर यांनी आपल्या पत्रामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विषयी माहिती दिली आहे.

Dinanath Hospital
Devendra Fadnavis: फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून त्याचवेळी मंगेशकर हॉस्पिटलला संपर्क,पण...'

सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून रुग्णालय वाटचाल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, याचवेळी त्यांनी कालचा दिवस इतिहासातील अत्यंत कळा व सुन्न करणारा दिवस होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने 'पब्लिक रिलेशन ऑफिसर'च्या अंगावर चिल्लर फेकली.

महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर व त्यांच्या आई-वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले या सर्व गोष्टी घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली आहे. लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांमध्ये मनावर काय परिणाम झाला असेल? देव जाणे, असं म्हणत त्यांनी आंदोलकांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

तर यावेळी त्यांनी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संबंधित विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत आणि या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपलं काय चुकलं? यावर आत्मचिंतन केल्याचंही केळकर यांनी म्हटलं आहे.

Dinanath Hospital
Tanisha Bhise Death Case : दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! घेतला 'हा' मोठा निर्णय

दरम्यान, याच पत्रात त्यांनी दीनानाथ रुग्णालात इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरी डिपार्टमेंट आलेला असो वा लहान मुलांच्या विभागातला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवाय या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू होईल. तर झालेल्या घटनेबद्दल सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत, याची मुख्यमंत्र्य देवेंद्र फडणवीस यांनी नोंद घ्यावी, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com