Uddhav Thackeray News :जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा झटका; 'या' नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

Pune Shivsena Political News: पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.
Uddhav Thackeray News, Mahesh Pasalkar join Shivsena
Uddhav Thackeray News, Mahesh Pasalkar join Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Pune : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ठाकरे गटानं आमदारांच्या अपात्रतेची कारवाई, पक्षबांधणी आणि आगामी निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच धर्तीवर ठाकरे यांनी आज( दि.१७) सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. याचदरम्यान, ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शनिवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. यानंतर आता सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची तातडीची आज बैठक बोलावली आहे. लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार असल्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. पुणे जिल्हाप्रमुखानं आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.

Uddhav Thackeray News, Mahesh Pasalkar join Shivsena
Pradeep Kurulkar Case Update : कुरुलकरांच्या अडचणी वाढणार; 'एटीएस'कडून 'पॉलिग्राफ' टेस्टची मागणी,काय आहे कारण?

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते. ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून पासलकर यांच्याकडे पाहिले जात होते. आगामी काळात मुख्यमंत्री शिंदे पासलकरांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

अत्यंत संघर्षातून जिल्हाप्रमुखपदावर...

महेश पासलकर(Mahesh Pasalkar) हे ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख आहेत. तसेच वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे ते अध्यक्षही आहेत. पासलकर हे अत्यंत संघर्षातून जिल्हाप्रमुखपदावर पोहोचले होते. त्यांची कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचवेळी ते शिवसेनेकडे आकर्षित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी त्यांना भूरळ घातली. त्यामुळे ते अंधेरीतील शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊ लागले. त्यावेळी माजी आमदार रमेश लटके, माजी मंत्री रविंद्र वायकर आणि भाऊ कोरगावकर यांच्या संपर्कात आले. तिथेच त्यांची शिवसैनिक म्हणून जडणघडण झाली.

Uddhav Thackeray News, Mahesh Pasalkar join Shivsena
Girish Mahajan Birthday: गिरीश महाजनांच्या होर्डिंगवर अजितदादा झळकले; नेमकं काय घडलं !

ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदें 'अॅक्शन मोड'वर

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटा(Thackeray Group)कडून विधानसभा अध्यक्षांवर दबावतंत्र वापरायला सुरूवात केली, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही अॅक्शन मोडवर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लीगल टीम घेऊन लढाईसाठी सज्ज आहेत असं दिसत आहे. कायदेशीर सल्ल्यानुसारच आता शिंदे यांच्याकडून पावलं टाकलं जाणार आहे. उद्धव ठाकरे त्यांचे आमदार कायद्याच्या कोंडीत सापडतात का याचीही चाचपणी शिंदे गटाकडून सुरु आहे.

....म्हणून ठाकरे गटाला रामराम ठोकला!

शिवसेनेचे ( उध्दव ठाकरे गट ) पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पासलकर यांनी स्वपक्षातील वरिष्ठांनी शिवसेना संपवायची सुपारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ असंही पासलकर म्हणाले होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांनी दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतत दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. ही बाब पासलकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या कानावर घातली. परंतू, त्यांनी त्यास महत्व दिले नाही. शिवसेनेत आपल्याला डावलले जात असल्याच्या कारणाने पासलकर यांनी राजीनामा दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com