Pune Gang War: पुण्यात पुन्हा गँगवॉर! पोलीस चौकी जवळच तरुणावर गोळीबार; वनराज आंदेकर हत्याकांडाशी संबंध?

Pune Gang War Youth Shot Near Police Chowky: पुण्यातील घोरपडे पेठ येथे पोलीस चौकीसमोर तरुणावर गोळीबार. मुख्य संशयित ताब्यात, वनराज आंदेकर हत्याकांडाशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास.
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी विश्व पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे आज दिसले. शहराच्या मध्यवर्ती घोरपडे पेठ परिसरात पोलीस चौकीपासून काही अंतरावर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आला.

या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूर शेख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी नूर शेख याच्यावर जवळून गोळीबार केला. गोळी त्याच्या पाठीत लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेने नूर शेख याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाठलाग करून पोलिसांनी घेतले ताब्यात

या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून सुजल सुनील परदेशी याचे नाव समोर आले आहे. गोळीबार करून तो साथीदारांसह घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तातडीने पाठलाग करून अवघ्या २० मिनिटात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हा सगळा प्रकार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटला. आरोपींनी तीन राऊंड फायर केले होते. मात्र, त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी कोणत्या मार्गाने पलायन केले, त्यांना कोणी मदत केली का, याचाही तपास सुरू आहे.

Pune Crime News
Bombay High Court: आईच्या जात प्रमाणपत्रावर मुलीला RTE प्रवेश; मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिला दणका

वनराज आंदेकर हत्याकांडाशी आहे का संबंध?

गोळीबारात जखमी झालेला नूर शेख हा राज्यभर गाजलेल्या वनराज आंदेकर हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye Witness) असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे त्या प्रकरणाशी संबंधित कोणता धागा आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र, या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

पोलीस चौकीसमोरच गोळीबार

विशेष म्हणजे हा गोळीबार पोलीस चौकीजवळच झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पूर्ववैमनस्य की गँगवॉर?

प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, गँगवॉर, आर्थिक व्यवहार, जुने वाद किंवा इतर कोणते कारण या गोळीबारामागे आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड, त्यांचे परस्पर संबंध आणि अलीकडील हालचालींचीही माहिती पोलिसांकडून पडताळली जात आहे.

Pune Crime News
Tukaram Mundhe FDA Raid: ताकात माशी, भजीत प्लास्टिक! तुकाराम मुंढेंच्या FDA ने BMCचे कॅन्टीन केले सील

तपास सुरू

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जखमी नूर शेख याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असून, त्यानंतर या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुण्यात अलिकडच्या काळात पुन्हा एकदा गोळीबार, टोळीयुद्ध आणि खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शहरातील गँगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली असून, पोलिसांसमोर अशा टोळ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com