Pune News: राष्ट्रवादीने थेट प्राध्यापकांना ‘फिल्डवर’ उतरवलं; दिलं 'पदवीधर' मतदार नोंदणीचं सक्तीचं टार्गेट

Pune Division Graduate and Teachers Constituency Election 2026 : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने इच्छुक उमेदवारांसह प्रमुख राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
Teacher
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदार नोंदणीचा धडाका सुरू आहे. मात्र, या राजकीय चढाओढीत महाविद्यालयांतील प्राध्यापकही भरडले जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित एका शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांना संस्था चालकांच्या दबावामुळे ‘पदवीधर मतदार नोंदणी’चे टार्गेट देण्यात आल्याची माहिती आहे. दिवसभराच्या शैक्षणिक कामांसोबतच पुणे विभागातील २५ पदवीधरांची नोंदणी करण्याची जबाबदारी प्रत्येक प्राध्यापकांवर टाकण्यात आली आहे.

राजकीय पक्षांकडून मतदार नोंदणीचा धडाका

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांसह पक्षांनीही मतदार नोंदणीवर जोर दिला आहे.

राजकीय पक्षांचं टार्गेट

पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीचे लक्ष्य देण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यात भाजपकडून नगरसेवकांना प्रत्येकी दीड हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे टार्गेट देण्यात आल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांना ५०० मतदार नोंदणीचे लक्ष्य देण्यात आल्याचेही सांगितले जाते. याशिवाय मंडल अध्यक्ष आणि पक्षाच्या स्थानिक यंत्रणेवरही मतदार नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे

Teacher
Reservation News: 'आम्ही आरक्षण सोडण्यास तयार,पण जोपर्यंत...'; मोदी सरकारच्या तीनही टर्ममध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याचं खळबळजनक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसनेही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाशी संबंधित पुणे जिल्ह्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांनाही मतदार नोंदणीचे काम देण्यात आल्याची माहिती आहे.

प्राध्यापकांना २५ मतदार नोंदणीचे टार्गेट?

संस्था चालकांच्या दबावामुळे प्राध्यापकांना थेट राजकीय टार्गेट देण्यात आल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. प्रत्येक प्राध्यापकाने किमान २५ पदवीधर मतदारांचे अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे शैक्षणिक कामांसोबतच प्राध्यापकांना मतदारांचे फॉर्म गोळा करणे, पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी करणे आणि संबंधित मतदारांची नोंदणी करून घेणे अशी कामे करावी लागत असल्याचे सांगितले जाते.

Teacher
Manoj Jarange: "जरांगेंचा बालहट्ट सुरु, त्यांची मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही"; भाजपच्या आमदारानं स्पष्टच सांगितलं

शालेय शिक्षकांना निवडणूक आयोगाने आधीच निवडणुकीच्या विविध कामांमध्ये गुंतवले आहे. मतदार नोंदणी, बीएलओ ड्युटी, आधार सीडिंग, विविध प्रकारची सर्वेक्षणे आणि इतर अशैक्षणिक कामांची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही पदवीधर मतदार नोंदणीचे काम दिल्याने शिक्षक-प्राध्यापक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. “आमचे प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून निवडून यायच्या आधीच आमचा बळी दिला जातोय,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्राध्यापक आणि शिक्षक वर्गातून उमटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com