Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर निवडणूक: अर्ज प्रक्रिया सुरू होताच मोठा ट्विस्ट; एका नावमुळे सर्वच पक्षांची गणितं बिघडली?

Pune Padvidhar election candidate list : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 'या' एका नावामुळे पक्षांची गणिते कशी बदलू शकतात, जाणून घ्या.
Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर निवडणूक: अर्ज प्रक्रिया सुरू होताच मोठा ट्विस्ट; एका नावमुळे सर्वच पक्षांची गणितं बिघडली?
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली, इच्छुकांनी अर्ज नेण्यासही सुरुवात केली; मात्र प्रमुख राजकीय पक्षांचा उमेदवार कोण, यावर अजूनही पडदा कायम आहे. त्यामुळे एका बाजूला इच्छुकांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागलेले डोळे, असे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.

पहिल्याच दिवशी पदवीधर मतदारसंघासाठी ३६ व्यक्तींनी ६१ अर्ज, तर शिक्षक मतदारसंघासाठी १९ व्यक्तींनी ३६ अर्ज नेले. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणखी वाढली आहे.

Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर निवडणूक: अर्ज प्रक्रिया सुरू होताच मोठा ट्विस्ट; एका नावमुळे सर्वच पक्षांची गणितं बिघडली?
Pune News: फुरसुंगी-उरुळी देवाचीमध्ये खळबळ! नगराध्यक्षांसह 28 नगरसेवकांचे पद धोक्यात? निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू

भाजप स्वबळावर; महायुतीतच ‘पेच’?

२०२०च्या निवडणुकीत पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे आमूलाग्र बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आता पुणे विभागाच्या दोन्ही जागांवर भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा स्वबळाचा निर्णय आणि मित्रपक्षांच्या अपेक्षा यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय गणितांकडेही लक्ष लागले आहे.

शिक्षक मतदारसंघात ‘शिक्षकांचा आमदार’ कोण?

शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व प्राध्यापक सचिन सानप यांनी ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ अशी भूमिका घेत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार सागर यांचेही नाव इच्छुकांमध्ये आहे. तर शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कौस्तुभ गावडे देखील या रेसमध्ये उतरले असून त्यांनी देखील मोठी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे शिक्षक मतदारसंघात केवळ पक्षीय राजकारणच नव्हे, तर शिक्षक संघटनांचे राजकारणही महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर निवडणूक: अर्ज प्रक्रिया सुरू होताच मोठा ट्विस्ट; एका नावमुळे सर्वच पक्षांची गणितं बिघडली?
Shiv Sena: ठाण्यात शिवसेना नेत्याची हत्या, ऑफिसमध्ये घुसून गोळ्या झाडल्या; दोन हल्लेखोर CCTVमध्ये कैद

पदवीधरमध्ये नावांची मोठी ‘फिल्डिंग’

पदवीधर मतदारसंघासाठीही अनेक नावांची चर्चा सुरू आहे. भाजपच्या पुण्यातील मंत्र्यांकडून शरद लाड यांच्या नावासाठी आग्रह असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांचे निकटवर्तीय भय्या माने यांना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यादेखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम यांचे नातेवाईक ऋषिकेश महेंद्र लाड यांच्या नावाचीही चर्चा आहे.

म्हणजेच, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय होण्याआधीच इच्छुकांनी आपापल्या पातळीवर ‘फिल्डिंग’ लावली आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात आणि कोणाची उमेदवारी कापली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर निवडणूक: अर्ज प्रक्रिया सुरू होताच मोठा ट्विस्ट; एका नावमुळे सर्वच पक्षांची गणितं बिघडली?
CM Devendra Fadnavis : पोलीस भरती परीक्षा अन् ट्रेनिंगमधून अग्निवीर जवानांना सूट; CM फडणवीसांची महत्वाची घोषणा!

दहा-बारा दिवसांत पाच जिल्हे पिंजून काढण्याचे आव्हान

उमेदवारीचा सस्पेन्स असला तरी निवडणुकीची वेळ मात्र वेगाने जवळ येत आहे. येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांत पाच जिल्ह्यांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असेल.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने संघटनात्मक यंत्रणा, मतदार संपर्क आणि प्रचाराचे नियोजन यासाठी उमेदवारांना अक्षरशः धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारासाठी मिळणारा अल्प कालावधीही महत्त्वाचा ठरणार आहे.

पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता खरी उत्सुकता आहे ती पक्षाचा ‘एबी फॉर्म’ नेमका कोणाच्या हातात पडतो? याची. उमेदवारांची घोषणा होताच आतापर्यंत पडद्याआड सुरू असलेली राजकीय गणिते उघड होणार असून, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीला खरी धार येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com