CM Devendra Fadnavis : पोलीस भरती परीक्षा अन् ट्रेनिंगमधून अग्निवीर जवानांना सूट; CM फडणवीसांची महत्वाची घोषणा!

Agniveer jawans police recruitment exam exemption Maharashtra : अग्निवीर जवानांसाठी महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा. पोलीस भरती परीक्षा आणि ट्रेनिंगमधून सूट देण्याबाबत CM देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

अग्निवीरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अग्निवीरांना राज्य सरकारच्या विविध विभागांसह पोलीस दलात रोजगाराची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवाकाळ पूर्ण करून परतणाऱ्या पात्र अग्निवीरांना राज्य पोलीस दलात थेट समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अग्निवीरांनी भारतीय सैन्यात सेवा बजावताना कठोर प्रशिक्षण आणि विविध प्रकारच्या परीक्षा पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळे राज्य पोलीस भरतीसाठी त्यांना पुन्हा परीक्षा किंवा स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच अग्निवीरांना राज्य पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत 4 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्तच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांसाठी मोठी बातमी; CM फडणवीसांनी दिला शब्द...

किनारपट्टी सुरक्षेसाठीही अग्निवीरांचा विशेष उपयोग केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशिक्षित अग्निवीरांना पोलीस दलात संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उपलब्ध पदांची संख्या कमी पडल्यास पात्र अग्निवीरांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी आवश्यकतेनुसार नवीन पदे निर्माण करण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे.

अग्निवीरांसाठी राज्य पोलीस दलात 10% विशेष आरक्षणाची तरतूद करण्याची माहितीही देण्यात आली आहे. याशिवाय माजी सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे सैन्यसेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना पुढील करिअरसाठी राज्य सरकारी नोकरीचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
IAS Divya Mittal : IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या दिव्या मित्तल अखेर राजकारणात येणार, काँग्रेस की भाजप? जाहीर केली भूमिका

विरोधकांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलन करताना संबंधित मुद्द्यांची वस्तुस्थिती आणि तथ्य समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com