Pune Graduate Election: पुणे पदवीधरच्या निकालाने भाजपला हादरा; थेट दिल्लीहून वरिष्ठ नेते पुण्यात, नगरसेवकांची शाळा भरणार?

Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला. या निकालानंतर बी. एल. संतोष पुण्यात बैठक घेऊन संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
National General Secretary BL Santosh is scheduled to visit Pune
National General Secretary BL Santosh is scheduled to visit PuneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Election Result News: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा तब्बल नऊ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे भाजपच्या संघटनात्मक तयारीवर प्रश्न उपस्थित झाले असून, पक्षाने या पराभवाची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष उद्या शुक्रवारी पुण्यात येणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

पदवीधर मतदारसंघातील निकालाने भाजपच्या पुणे शहरातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्याची वेळ आणली आहे. विशेषतः मतदार नोंदणी, प्रत्यक्ष मतदानासाठी मतदारांना बाहेर काढणे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बजावलेली भूमिका या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ पराभवाची कारणमीमांसा होणार की नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचा जाबही विचारला जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मतदार नोंदणीपासून संघटनात्मक कामकाजापर्यंत आढावा

पदवीधर निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. या पराभवामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याचा शोध पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील पदवीधर मतदारांची नोंदणी किती झाली, नोंदणीकृत मतदारांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते कितपत पोहोचले आणि मतदानाच्या दिवशी संघटनेची यंत्रणा किती प्रभावीपणे कामाला लागली, याचा आढावा घेतला जाऊ शकतो.

National General Secretary BL Santosh is scheduled to visit Pune
Nashik Kumbh Mela News: नरेंद्राचार्य सरकारच्या मदतीला धावले! ‘वीज हवी की नको?’ म्हणत वृक्षतोडीचे समर्थन; बिगर हिंदूंच्या दुकानांनाही विरोध

निवडणुकीच्या काळात पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या कितपत पार पाडल्या, यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांतर्गत कामकाजाबाबत वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना दिल्या जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

केंद्रीय नेतृत्वाकडून दखल; पुण्यातील पदाधिकाऱ्यांचे काय?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पदवीधर निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संघटनात्मक परिस्थिती, पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले जाते आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणत्या सूचना दिल्या जातात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

National General Secretary BL Santosh is scheduled to visit Pune
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना मोठी अपडेट! SC प्रवर्गातील महिलांसाठी 344 कोटींचा निधी मंजूर; सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार?

हर्षदा देशमुख यांच्या विजयाने भाजपसमोर पुण्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्याचे आव्हान उभे केले आहे. आता बी. एल. संतोष यांच्या बैठकीतून कोणते निष्कर्ष समोर येतात आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला कोणत्या सूचना दिल्या जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com