Pune Bomb News: हडपसरमध्ये आढळलेला तो बॉम्बच होता, घातपाताचा प्रकार, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Hadapsar Bomb Incident: पुण्यातील हडपसर परिसरात सापडलेली वस्तू बॉम्बच होती आणि तो घातपाताचा प्रयत्न होता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ATS आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Devendra Fadnavis statement on Pune bomb case
Devendra Fadnavis statement on Pune bomb caseSarkarnama
Published on
Updated on

Pune police investigation on bomb scare: पुण्यातील हडपसर भागातील एका रुग्णालयात काल (बुधवारी) संध्याकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपासात ही कमी तीव्रतेची स्फोटक यंत्रणा (Low-Grade Explosive Device) असल्याचे समोर आले आहे, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) ती सुरक्षितपणे निकामी केली. या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिस, ATS, क्राईम ब्रँच आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील या बॉम्बबाबत माहिती दिली, पुण्यातील रुग्णालयात आढळलेला बॉम्बच होता, घातपाताचा प्रकार होता, असे फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले.

या घटनेदरम्यान रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. काही वेळ परिसरातील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. ही वस्तू कमी क्षमतेच्या स्फोटकासह टायमर यंत्रणा जोडलेले IED (Improvised Explosive Device) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Devendra Fadnavis statement on Pune bomb case
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा! मुख्य सूत्रधार झीशान अख्तर नेपाळमध्ये?

या वस्तूला सात तासांचा टायमर जोडलेला असल्याची माहिती समोर आली आहे. BDDS पथकाने अत्यंत काळजीपूर्वक ही वस्तू रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत नेऊन नियंत्रित स्फोटाद्वारे निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Devendra Fadnavis statement on Pune bomb case
TET Compulsory For Promotion: ZP शिक्षकांना मोठा धक्का! TET शिवाय पदोन्नती नाही; हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं

रुग्णालयातील CCTV फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आली आहे. ही व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून आली होती आणि त्यानेच संशयास्पद वस्तू ठेवली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. आता ATS आणि पुणे पोलिस या प्रकरणाचा दहशतवादी अँगलनेही तपास करीत आहेत.

या संपूर्ण घटनेत डॉक्टर विलास गायकवाड यांच्या धाडसाचीही चर्चा होत आहे. रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी स्वतः संशयास्पद बॉक्स उचलून बाहेर नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com