Pune Hit And Run Case : ससून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील तिसरा मासा पोलिसांच्या गळाला!

Pune Police News : अतुल घटकांबळे हा तावरे याचा विश्वासातला माणूस असून या प्रकरणांमध्ये झालेल्या पैशाच्या देवानघेवाणीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे.हे सॅम्पल बदलण्यासाठी तब्बल तीन लाखांची सेटलमेंट झाला असल्याचा देखील पोलीस तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत..
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune News : कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणांमध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. सोमवारी या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्यचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ससून मधील दोन डॉक्टरांना पोलिसांनी सकाळीच अटक केली असून आता ससून रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे 19 तारखेला ब्लड सँपल घेण्यात आले. ते दुसऱ्याचे बल्ड सँपल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपल ससून येथील डॉक्टरांनी घेतले आणि ते डस्टबिन मध्ये फेकून दिले.त्याच्या जागी दुसऱ्या कुणाचे तरी ब्लड सॅम्पल घेऊन ते अल्पवयीन तरुणाचे असल्याचे सांगण्यात आले, असे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Hit And Run Case
Deepak Kesarkar on Ravindra Dhangekar : 'एक बोट तुम्ही एकाकडे दाखवता तेव्हा चार बोट तुमच्याकडे वळलेली आहेत', शिंदे गटाच्या नेत्याने कोणाला फटकारले !

ससूनमधील डॉ. श्रीहरी हलणोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्यास समोर आले आहे. ससून मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हलणोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचं पोलिसांकडून (Police) सांगण्यात आलं आहे. डॉ. श्रीहरी यांनी ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ब्लड सॅम्पलच्या साठ्या मधून ते उचलण्यात आले असा पोलिसांचा अंदाज असून याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणांमध्ये आता ससून रुग्णालयामध्ये शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या अतुल घटकांबळेला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केला आहे. अतुल घटकांबळे हा तावरे याचा विश्वासातला माणूस असून या प्रकरणांमध्ये झालेल्या पैशाच्या देवानघेवाणीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. हे सॅम्पल बदलण्यासाठी तब्बल तीन लाखांची सेटलमेंट झाला असल्याचा देखील पोलीस तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. ब्लड सॅम्पलच्या अदलाबदली प्रकरणी आता तिघांना अटक केलेली असून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. पुणे पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. यावरती कोर्ट (Court) काय निर्णय घेतो हे पाहावे लागणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Pune Hit And Run Case
Excise Deparment News : सुषमा अंधारेंच्या वसुली यादीने 'एक्साइज' घायाळ, अधिक्षकांचे प्रत्युत्तर 500 गुन्हे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com