

Pune Hospital Bomb Case: हडपसर परिसरात असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आल्यानं दहशतवाद विरोधी पथकासह पुणे पोलिसांचेही धाबे दणाणले होते.या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती.अखेर हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठं यश आलं आहे.आता बॉम्ब ठेवण्यामागची पूर्ण हिस्ट्रीच समोर आली आहे.
एटीएसनं नागपूर रेल्वे स्थानकावर हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवणाऱ्या शिवाजी राठोड या संशयित आरोपीला अटक केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता.15) या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती सांगितली.
अमितेश कुमार म्हणाले,पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी शिवाजी राठोड यानं हे कृत्य खंडणीसाठी केल्याचं समोर आलेलं आहे. राठोड हा 10 मे रोजी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यानं बॉम्ब ठेवण्याचं कृत्य केलं. आरोपीनं ऑनलाइन बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतलं असून,युट्युबवरील व्हिडिओ पाहत त्यानं बॉम्ब बनवल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली
संशयित पुण्यातील हडपसर परिसरातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणातील आरोपी शिवाजी राठोड हा आझाद हिंद एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 6 वर उतरत असतानाच एटीएसच्या पथकानं त्याला अटक केली. यानंतर त्याला नागपूर एटीएसच्या कार्यालयात नेणण्यात आलं. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यानं आपला सर्व प्लॅन सांगितला.
अमितेश कुमार यांनी या प्रकऱणात महत्वपूर्ण माहिती देतानाच आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं होतं. तसेच रात्रीपर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहचणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण या प्रकरणात कोणतेही दहशतवादी अँगल किंवा कनेक्शन नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हा सर्व धक्कादायक प्रकार आरोपीने एकट्यानेच केल्याचंही ते म्हणाले.
तसेच पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आत्तापर्यंत आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समोर आलेलं आहे. दहा तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. पण त्याच्याकडे पैसेच नसल्यानं त्यानं खंडणीसाठी हे कृत्य केल्याचंही पोलिस आयुक्त यावेळी म्हणाले.
पोलिस आयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले, आरोपी शिवाजी राठोड याला ताब्यात घेताना सीसीटीव्ही आधार घ्यावा लागला. धक्कादायक माहिती देताना अमितेश कुमार यांनी सांगितले की, राठोडच्या घरात एक घड्याळ मिळालं, जे बॉम्ब संबंधित होते.याचमुळे पोलिसांचा संशय बळावला व ATS ने त्याला नागपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.