Pune Budhwar Peth : पुण्याच्या बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांची विक्री करणाऱ्या पापा शेखची पोलिसांना हुलकावणी! जामिनावर सुटला ते पुन्हा सापडलाच नाही...

Pune Budhwar Peth sex racket : फेब्रुवारी २०२६ मध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या धाडसी छाप्यात ११ बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली होती. या महिलांना नोकरी, सौंदर्यप्रसाधन पार्लर किंवा शिलाई कामाच्या खोट्या आमिषाने बांगलादेशातून कोलकाता मार्गे पुण्यात आणण्यात आलं होतं.
Budhwar Peth Crime
Budhwar Peth Crimesarkarnama
Published on
Updated on

Pune News, 23 Mar : पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील मानवी तस्करी आणि देह व्यापाराच्या कुख्यात प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाबू भाई ऊर्फ पापा शेख अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या २० वर्षांपासून या अंधाऱ्या गल्लीत आपलं साम्राज्य उभारणाऱ्या या कथित बांगलादेशी मूळच्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष शोध मोहीम निष्फळ ठरली आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या धाडसी छाप्यात ११ बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली होती. या महिलांना नोकरी, सौंदर्यप्रसाधन पार्लर किंवा शिलाई कामाच्या खोट्या आमिषाने बांगलादेशातून कोलकाता मार्गे पुण्यात आणण्यात आलं होतं.

बनावट आधार कार्ड, रेशन कार्डसह भारतीय ओळखपत्रे तयार करून त्यांना अवैधपणे राहण्यास भाग पाडलं जात होतं. अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा (पीटा) अंतर्गत चार वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, बाबू भाई आणि त्याचा साथीदार संजय एस यांना मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित केलं आहे.

Budhwar Peth Crime
Satara ZP controversy : पत्नी झेडपी अध्यक्ष होताच महेश शिदेंचा कॉन्फिडन्स वाढला, थेट मंत्री शंभुराज देसाईंना घेतलं अंगावर

वेटर ते 'पापा' शेख : २० वर्षांचा काळा इतिहास

बाबू भाईने सुरुवातीला बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामं केली. हळूहळू वेश्या व्यवसायाच्या बारकाव्यांशी परिचित झालेल्या या व्यक्तीने बांगलादेशातील एजंटांच्या मदतीने महिलांना पुण्यात आणण्याचा धंदा सुरू केला. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने किमान ९ महिलांना थेट पुण्यात आणलं.

त्याच्या तिन्ही पत्नी त्यातील 2 बांगलादेशी असून त्या बुधवार पेठेत वर्चस्व राखून होत्या. पीडित महिलांना धमकावणे, मारहाण करणे आणि कुंटणखान्यातून बाहेर पडू न देणे असे प्रकार त्यांच्या माध्यमातून चालवले जात होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक झालेल्या बाबू भाईला जानेवारी २०२५ मध्ये येरवडा कारागृहातून जामिनावर सुटका मिळाली. पण जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा हाच धंदा सुरू केला आणि पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. त्याने सर्व संपर्क तोडले असून, नातेवाइक आणि मित्रमंडळींकडूनही कोणताही ठोस धागा लागलेला नाही.

Budhwar Peth Crime
Rupali Chakankar : खरातसोबत व्हिडिओत असलेल्या महिलेची चौकशी करताच चाकणकरांचा हस्तक्षेप; अनावश्यक प्रश्न म्हणत पोलिसांनाच धमकावलं...

पोलिसांची शोधमोहीम: बंगाल ते ईशान्य

पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली. नातेवाइकांच्या घरी छापे, चौकशी केली, पण बाबू भाई 'खाकी' आणि 'खादी' दोघांशीही परिचित असल्याने त्याला पूर्वसूचना मिळाली असावी, असा संशय आहे. त्याचा साथीदार संजय एस सुद्धा फरार आहे आणि दोघेही पोलिसांच्या रडारवर आहेत.

पोलिसांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या महिलांच्या जबाबात बाबू भाईचं नाव स्पष्टपणे आलं आहे. पीडित महिलांना बांगलादेशात डेपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर रॅकेटच्या इतर दलाल आणि सीमेवरील बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशी चालू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com