Rohit Pawar News : 'RTO' ने डोळे मिटून दूध पिलं तर 'एक्साईज' विभाग नशेत, किडलेल्या व्यवस्थेला बायपास 'सर्जरी'ची आवश्यकता; रोहित पवारांचा निशाणा !

Mla Rohit Pawar Social Media Post : कल्याणीनगर प्रकरणामध्ये पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय व्यवस्थेतील गलथान कारभार समोर आला आहे. यावर बोट ठेवत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये रोज नवनवीन खुलासे बाहेर येत असतानाच विरोधकांकडून सरकारच्या कार्यपद्धतीवरती आणि प्रशासनाच्या भूमिक वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असून पुन्हा एकदा त्यांनी सरकार वरती आणि व्यवस्थित प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये आता अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांन पाठोपाठ आईला देखील अटक करण्यात आलेले आहे. तसेच या प्रकरणांमध्ये पोलीस आरटीओ आणि वैद्यकीय व्यवस्थेतील गलथान कारभार समोर आला आहे. यावरतीच बोट ठेवत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणता, कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं. पोलिस (Police) विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं. बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं.

Rohit Pawar
Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा पोलिस आयुक्तांना फोन? स्वतःच दिले उत्तर

एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही (Pmc) मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला. हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. इतरही सगळ्या विभागात हेच सुरु असून सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली ही व्यवस्था सरकार कुणाचंही असलं तरी केवळ पॉवरफुल लोकांना पायघड्या घालून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते.

Rohit Pawar
Pune Porsche Accident : वडील, आजोबानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांकडून अटक, कारण काय?

म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही. असं रोहित पवार म्हणाले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Rohit Pawar
Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी क्राईम ब्रँचचे मोठे पाऊल; आता अल्पवयीन आरोपीचीच चौकशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com