Sharad Pawar: शरद पवारांच्या उमेदवाराची EVM वरील शंका दूर होणार? 'या' मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

Khadakwasla Assembly Recounting: Sharad Pawar NCP Candidate EVM Clarity: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. यानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल 11 महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी प्रारूप मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र बहुतांश उमेदवारांनी हे अर्ज मागे घेतले असून पुणे शहरातील फक्त खडकवासला विधानसभा मतदारसंघात आता प्रारूप मतमोजणी होणार आहे.

जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार भोर, पुरंदर व दौंड मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेले फेरमत मोजणीचे अर्ज माघारी घेतले आहेत. शिरूर मतदारसंघातील उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने प्रतिरूप मतमोजणीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे.

Sharad Pawar
Sanjay Ruat : दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? त्यांच्याच आमदाराने दिली माहिती, राऊतांचा खळबळजनक दावा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ आणि काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश होता. यामधील बारामती विधानसभा मतदार संघातील युगेंद्र पवार यांनी माघार घेतल्यानंतर १० अर्ज शिल्लक राहिले होते. त्यानंतर भोर, पुरंदर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही माघार घेतली आहे.

Sharad Pawar
Beed Crime : बीडमध्ये मोठी कारवाई; शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, अजून कारवाईचे संकेत

आता उरलेल्या सहा मतदारसंघांमधील उमेदवारांनी उच्च न्यायालयात ईव्हीएम बाबत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे फक्त खडकवासला मतदारसंघातील उमेदवाराने आपला तपासणी व पडताळणीचा अर्ज कायम ठेवला आहे. खडकवासला मतदारसंघातील अर्जावर प्रतिरूप मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे.

खडकवासलात सचिन दोडके (राष्ट्रवादी -शरद पवार), भीमराव तापकिर (भाजप), मयूरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपलं वर्चस्व दाखवत विजय मिळवला आहे. भीमराव तापकिर यांनी विजयाचा चौकार मारला आहे. दोडके यांनी प्रतिरूप फेरमोजणीसाठी अर्ज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com