PM Narendra Modi Nashik Sabha: कांद्याचा मुद्दा तापला, पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ; मोदी म्हणाले,जय श्रीराम..!

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
PM Narendra Modi Nashik Sabha
PM Narendra Modi Nashik SabhaSarkarnama

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत गोंधळ झाला. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असतानाच कांदा विषयावर बोला, अशी मागणी सभा ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकाने केल्याने हा गोंधळ उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने या नागरिकाला ताब्यात घेत तेथून बाहेर नेले. झालेला गोंधल लक्षात येताच मोदी जय श्रीराम असे म्हणाले त्यानंतर त्यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.

PM Narendra Modi Nashik Sabha
Local Self-Government News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आशेने इच्छुक कंगाल, वर्गणी देऊन झोळी झाली रिकामी !

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये ही सभा झाली. कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे. दिंडोरी मतदरासंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती. ॉकाही शेतकऱ्यांनी मोदींना जाब विचारणार असा इशारा दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव इशारा देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले होते. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध कांदा उत्पादक संघटना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.मोदींच्या सभेत कोणता गोंधळ नको म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती. मोदी यांच्या सभेत कोणतीही गडबड, गोंधळ होऊ नये, यासाठी सभेचे ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी आणि चौकशी केल्यानंतरच त्याला सोडले जात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. या सभेत मोदींनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीकेची झोड उठवली. नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं विधान करत पुन्हा एकदा डिवचलं आहे. वीस ते पंचवीस मिनिटांच्या मोदी यांच्या भाषणानंतर अचानक उपस्थित नगरिकांकडून कांदा प्रश्नावर बोला, अशी मागणी केली जाऊ लागली. सभा ऐकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या एका गटाकडून ही मागणी करत घोषणा दिल्या जात असल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

PM Narendra Modi Nashik Sabha
Madhavi Raje Shinde Passes away : ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन!

परिस्थितीचे गांर्भिय लक्षा घेत बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जे नागरिक कांद्यावर बोला, अशी मागणी करत होते. तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. मागणी करणाऱ्या नागरिकांना तातडीने तेथून बाहेर काढण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे मोदी यांच्या भाषणात खंड पडला. कांद्यावर बोला अशी मागणी करणाऱ्यांचा आवाज येताच उपस्थित काही नागरिकांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. या दरम्यान, पोलिसांनी कांद्यावर बोलण्याची मागणी करणाऱ्यांना तेथून बाहेर नेले. हा वाढलेला गोंधळ लक्षात घेत 'जय श्रीराम, भारत माता की जय', अशी घोषणा देत पंतप्रधान मोदी यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.

PM Narendra Modi Nashik Sabha
Narendra Modi : 'नकली शिवसेना' म्हणत नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण, म्हणाले...

कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहे. नाशिक भाग हा द्राक्ष आणि कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे आमचे सरकार आहे ज्यांनी पहिल्यांदा कांद्याचा साठा बनविण्याची व्यवस्था सुरू केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी कोणतीही व्यवस्थाच नव्हती. मागच्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांकडून सात लाख मेट्रीक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला. अजूनही सरकार पाच लाख मेट्रीक टन कांद्याचा साठा तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमच्या प्रयत्नांमुळे कांद्याची निर्यात ३५ टक्के वाढली आहे. दहा दिवसांपूर्वीच कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. सरकार ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून कांद्याच्या वाहतुकीसाठी देखील सबशिडी देत आहे.

PM Narendra Modi Nashik Sabha
Narendra Modi News : कांद्याच्या राजधानीत पीएम मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, पाच वर्षात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com