Congress News : विदर्भातील 10 आमदार पुण्यात तळ ठोकून, रवींद्र धंगेकरांसाठी विशेष रणनीती

Pune Loksabha : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आहे. त्या गटबाजीचा फटका रवींद्र धंगेकर यांना बसू नये यासाठी नाना पटोले यांनी प्रचाराचे नियोजन हातात घेतलं असल्याची चर्चा आहे.
Congress
Congress Sarakarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये काँग्रेसला अच्छे दिन येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील मतदान पहिल्या टप्प्यात पार पडले आहे. मात्र, विदर्भातील आमदारांची नाना पटोलेंनी विशेष टीम बनवली आहे. ही दहा आमदारांची टीम पुण्यात पाच दिवस तळ ठोकून असणार आहेत. ही टीम थेट पक्षाला रिपोर्ट पाठवणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Congress
Mahadev Jankar: लोकसभेचं मतदान पार पडताच जानकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, 'मेलो तरी चालेल पण कमळ चिन्हावर...'

पुण्यात रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्यासाठी प्रचार यंत्रणा कशी राबवावी यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लक्ष ठेवून आहेत. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळला होता. लोकसभेतही ते असाच विजय खेचून आणतील, असा आत्मविश्वास काँग्रेस नेते बोलून दाखवत आहेत

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसमधील Congress अंतर्गत गटबाजी आहे. त्या गटबाजीचा फटका रवींद्र धंगेकर यांना बसू नये यासाठी नाना पटोले यांनी प्रचाराचे नियोजन हातात घेतलं असल्याची चर्चा आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून विदर्भातील दहा आमदार पुण्यात तळ ठोकणार आहेत.

'हे' आमदार पुण्यात

विदर्भातील 10 आमदार पुण्यात तळ ठोकून पक्षाला रिपोर्ट सादर करणार आहेत. या आमदारांमध्ये यशोमती ठाकूर, सुनील केदार, धीरज लिंगडे, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, अमित झणक, राजु आवळे, नाना पटोले यांचा समावेश आहे.

...तर काँग्रेसला 'अच्छे दिन'

काँग्रेस पक्षाकडून आमदार यशोमती ठाकूर,आणि आमदार सुनील केदार यांची पुण्यातील मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघाव काँग्रेसचे आमदारांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे यंदा लोकसभेत काँग्रेसला अच्छे दिन येतील असे काँग्रेस नेते सांगत आहेत.

Congress
Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांना हवाय शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद; 'मतांचा प्रसाद' मिळणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com