Baramati By Election: लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणार? युगेंद्र पवारांचं मोठं वक्तव्य

NCP Baramati Election: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्यास स्पष्ट केलं आहे. अशातच बारामतीमधील धनगर समाजाकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
Yugendra Pawar
Yugendra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणूक आयोगाकडून बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बारामती मधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्यास स्पष्ट केलं आहे. अशातच बारामतीमधील धनगर समाजाकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस ,शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

बारामतीमधील मेडिकल कॉलेजला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीला धनगर समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही अशी भूमिका समाजाकडून घेण्यात आली आहे. ओबीसी आंदोलन गाजवणारे लक्ष्मण हाके यांना या ठिकाणाहून मैदानात उतरवण्याची तयारी देखील असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

बारामती पोटनिवडणुकी बाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून महाविकास आघाडीतर्फे बारामतीमध्ये कोणताही उमेदवार दिला जाणार नाही. आणि ही निवडणूक बिनविरोध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बारामतीकरांची देखील ही निवडणूक बिनविरोध हवी अशी इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सुनेत्रा पवार यांची साथ देऊन त्यांच्या माध्यमातून बारामतीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे.

Yugendra Pawar
Laxman Hake : बारामतीची पोटनिवडणूक लढविण्याबाबत लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान; ‘शेकडो कॉल आलेत, मी उद्या बारामतीला जातोय ’

धनगर समाजाने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालय बारामतीत आणण्यात दादांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचं नाव त्या वस्तूला देण्याबाबतचा निर्णय होत आहे. अजितदादांसह पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने जातीपातीचे राजकारण कधीच केलं नाही.

दादांनी बारामती तालुक्यासाठी खूप काही केला आहे. त्यांचे उपकार या तालुक्यावर आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांशी चर्चा करणार आहोत त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Yugendra Pawar
Govind Barge Case: माजी उपसरपंच आत्महत्येप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट;'नर्तिके'ची पोलिसांसमोर मोठी कबुली; कला केंद्राच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट'?

लक्ष्मण हाके यांचं नाव बारामती विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. याबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कुणीही कुठेही जाऊन निवडणूक लढू शकतं त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर ते ही निवडणूक लढू शकतात असं युगेंद्र पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com