Schools Holiday : मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या 101 शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर; पाणी कपातही रद्द

PMC schools closed due to flood situation : पुणे महापालिकेने 101 शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर केली असून नियोजित पाणी कपातही रद्द केली आहे.
Schools Holiday : मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या 101 शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर; पाणी कपातही रद्द
Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : देहू आणि आळंदीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची राहण्याची सोय योग्य प्रकारे व्हावी, यासाठी पुणे महापालिकेच्या एकूण १०१ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज याबाबतची अधिकृत घोषणा केली.

त्याचप्रमाणे वारीच्या काळात शहरात पाण्याचा तुटवडा भासू नये आणि भाविकांची तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आजपासून शहरातून पालखीचे प्रस्थान होईपर्यंत, म्हणजेच येत्या १२ जुलैपर्यंत शहरातील पाणीपुरवठा कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

Schools Holiday : मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या 101 शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर; पाणी कपातही रद्द
IPS officer resignation : IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; 13 वर्षांचा ड्रीम जॉब झटक्यात सोडला : पोलीस दलात खळबळ

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी आणि देहू परिसरात पाणी साचल्याने भाविकांच्या मुक्कामाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून महापालिकेने पुणे शहरातील तब्बल १०० पेक्षा जास्त शाळांचे दरवाजे वारकऱ्यांसाठी खुले केले असून, तिथे आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत.

विशेषतः भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळा आणि आंबेडकर महाविद्यालयाच्या आवारात मोठे तंबू उभारण्यात आले असून, येथे अंदाजे १,००० लोकांच्या राहण्याची आणि बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे.

Schools Holiday : मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या 101 शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर; पाणी कपातही रद्द
Girish Mahajan : 'महिनाभराचा पाऊस दोन दिवसांत पडला, सरकार कुठेही कमी पडलं नाही'; गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

आषाढी वारीची परंपरा, नदीला आलेला पूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना व घोषणांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने ही संपूर्ण तयारी युद्धपातळीवर पूर्ण केली आहे. या निर्णयानुसार ज्या १०१ शाळांमध्ये दिंडी आणि वारकरी मुक्कामाला आहेत, त्या शाळा रविवारपर्यंत पूर्णपणे बंद राहतील आणि तोपर्यंत शहरातील पाणीपुरवठाही नियमित सुरू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com