

ओडिशा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या भुवनेश्वरचे डीसीपी म्हणून कार्यरत असलेले जगमोहन मीना यांनी अचानक राजीनामा दिल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 2013 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या मीना यांनी तब्बल 13 वर्षे सेवा बजावला आहे. त्यांनी त्यांचा ड्रीम जॉब अचानक सोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, त्यांनी तडकाफडकी असे पाऊल का उचलले याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जगमोहन मीना यांनी आपल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांच्या राजीनाम्यावर शासनाकडून अंतिम निर्णय झालेला नसून राजीनामा मंजूर झालेला नाहीये. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला जाणार आहे.
आपल्या सेवाकाळात मीना यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. माओवादविरोधी मोहिमा, गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यातील अनेक संवेदनशील जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले असून त्यांच्या कार्याची नेहमीच दखल घेतली गेली.
राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी असलेले जगमोहन मीना यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेचे प्रवेश केला. ते आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. मलकानगिरी, अंगुल, गंजाम आणि कटकसह विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले. 2019 मध्ये नक्षलग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यात यशस्वी मोहिमा राबवून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या सेवेसाठी त्यांना Police Gallantry Medal (2019), Police Internal Security Service Medal (2021) आणि Governor’s Medal (2023) यांसारखे सन्मानही मिळाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.