

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मेट्रोच्या नियोजनाचे आणि बांधकामाच्या दर्जाचे वाभाडे निघाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुण्यातील प्रमुख मेट्रो स्थानकांच्या छतातून चक्क पावसाचे पाणी गळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रवाशांनी थेट मेट्रो स्टेशनमधील पाणी गळतीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एका ट्विटर युझरने सोशल मीडिया पोस्टद्वारे थेट पुणे मेट्रो प्रशासनाकडे या ढिसाळ कारभाराबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, पुण्यातील बहुतांश मेट्रो स्थानकांच्या छतातून पावसाचे पाणी गळत आहे. यात प्रामुख्याने अत्यंत गजबजलेल्या 'छत्रपती संभाजी महाराज' मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याचे प्रवाशांना पाहायला मिळाले.
प्रवाशांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये, प्रवाशांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट्सजवळ आणि परिसरात छतातून पाणी टपकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे पाणी रोखण्यासाठी मेट्रो प्रशासनाला तिथे चक्क प्लास्टिकच्या बादल्या ठेवाव्या लागल्या आहेत. प्रवाशांचा पाय घसरून अपघात होऊ नये म्हणून तिथे चेतावणी फलक लावण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
फक्त छत्रपती संभाजी महाराज स्थानकच नव्हे, तर नुकत्याच सुरू झालेल्या 'स्वारगेट' मेट्रो स्थानकातही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे उघड झाले आहे. येथेही गळणारे पाणी साचू नये म्हणून स्थानकात ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या आहेत.
शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या हायटेक स्थानकांमध्ये पहिल्याच मोठ्या पावसात अशी दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे मेट्रो स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास मिळावा, ही मेट्रो प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन छताची गळती थांबवावी आणि याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी," अशी मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.