NCP Politics : मोहिते, थोरात, शिवतारे, लांडे आमदारकीसाठी रांगेत! 'राष्ट्रवादी'मध्ये शहर-ग्रामीण वाद पेटला; सुनेत्रा पवारांची पसंती कोणाला?

Pune MLC Election NCP Rural vs Urban : विधान परिषदेच्या आमदारकीसाठी स्थानिकमधून राष्ट्रवादीमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्याता आता शहर विरुद्ध ग्रामीण नवा वाद निर्माण झाला आहे.
NCP leaders engaged in intense discussions as Pune MLC election candidature triggers rural versus urban political debate.
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे आणि त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'शहर विरुद्ध ग्रामीण' असा उघड संघर्ष पेटलाय.

"शहराला खूप झालं, आता ग्रामीण भागातील नेत्याला संधी द्या," असा थेट पवित्रा ग्रामीण भागातील नेत्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या बैठकीत शहरातील नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली, पण त्याला शह देण्यासाठी आता ग्रामीण भागातील नेतेही कमालीचे ॲक्टिव्ह झाले आहेत.

या संघर्षामागचं खरं गणित आहे ते आकड्यांचं. पुणे जिल्ह्यातील या मतदारसंघात एकूण ८११ मतदार आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचे मिळून २९३ मतदार होतात, तर ग्रामीण भागाचे म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे तब्बल ५१८ मतदार आहेत.

म्हणजेच शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांची संख्या थेट दुप्पट आहे. एवढं मोठं संख्याबळ पाठीशी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकदाही ग्रामीण भागातल्या नेत्याला इथे संधी दिलेली नाही, हाच आता ग्रामीण नेत्यांच्या नाराजीचा मुख्य मुद्दा बनला आहे.

गेल्या अडीच दशकांचा इतिहास पाहिल तर ग्रामीण भागाच्या पदरात केवळ ९ महिने आले आहेत. सन १९९८ मध्ये काँग्रेसचे प्रा. रामकृष्ण मोरे निवडून आले होते, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत सासवडचे चंदुकाका जगताप विजयी झाले आणि त्यांना तेवढाच ९ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. त्यानंतर २००४ मध्ये पिंपरी-चिंचवडचे लक्ष्मण जगताप अपक्ष निवडून आले. २००९ मध्ये जगताप विधानसभेवर गेल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने पुणे शहरातून वंदना चव्हाण यांना संधी दिली.

पुढे २०१० ते २०२२ या प्रदीर्घ काळात पुणे शहरातील अनिल भोसले यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. ५ डिसेंबर २०२२ रोजी भोसले यांचा कार्यकाळ संपला, पण स्थानिक संस्थांवर प्रशासकराज असल्याने गेली चार वर्षे ही जागा रिक्त आहे.

NCP leaders engaged in intense discussions as Pune MLC election candidature triggers rural versus urban political debate.
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

इच्छुकांची मोर्चेबांधणी

या सगळ्या 'पॉवर गेम'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी फौज तयार झाली आहे. यामध्ये माजी आमदार दिलीप मोहिते, अजित गव्हाणे, माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पक्षश्रेष्ठी शहराच्या दबावापुढे झुकणार की ग्रामीण भागाचा हा 'हक्काचा' दावा मान्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या 25 वर्षांत कोणासा संधी?

थोडक्यात सांगायचं तर, गेल्या २५ वर्षांत वंदना चव्हाण आणि अनिल भोसले यांच्या माध्यमातून पुणे शहराला ११ वर्षे, तर प्रा. रामकृष्ण मोरे आणि लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला १० वर्षे संधी मिळाली. सर्वाधिक मतदार असूनही ग्रामीण भागाकडे झालेल्या या दुर्लक्षामुळे आता 'आम्हालाच उमेदवारी हवी' असा सूर तीव्र झाला आहे. ग्रामीण भागातून तरुण, उच्चशिक्षित आणि अनुभवी चेहऱ्याला मैदानात उतरवण्याची मागणी केली जात आहे.

NCP leaders engaged in intense discussions as Pune MLC election candidature triggers rural versus urban political debate.
NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com