Pune MNS : मनसेत वागसकर, मोरे अन् बाबर गट; पुण्यात पक्षाच्या राजकारणाचा हरवला पट !

Vasant More, Babu Wagaskar, Sainath Babar : पदाधिकाऱ्यांतील गटबाजीमुळे पुण्यातील मनसे कार्यकर्ते संभ्रमात
Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Sainath Babar, Vasant More, Babu WagaskarSarkarnama
Published on
Updated on

चैतन्य मचाले

Pune Political News : महाराष्ट्र नवनिर्माणाचा ध्यास घेऊन स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुण्यात बॅकफूटवर गेली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले गटतट आणि अंतर्गत कलह याचा फटका इतर राजकीय पक्षांप्रमाणे मनसेलादेखील बसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. मराठीच्या मुद्द्यावर सतत आक्रमक असलेले शहर मनसे आता दुकानांवर लावण्यात येणाऱ्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर एक चकार शब्ददेखील काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी हा पक्ष काम करेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परप्रांतीयांमुळे मराठी तरुणांवर होणारा अन्याय, मराठी भाषेचा वापर, रेल्वेमध्ये मराठी मुलांना डावलणे, अशा विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेत मनसेने आंदोलने केली होती. त्याचा परिणाम म्हणून अनेक कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे इतर राज्यांतून पुणे शहरात नोकरीनिमित्त आलेल्यांना आता मराठी भाषा बोलता येऊ लागली आहे. तरुणाईचा पक्ष म्हणून मनसेकडे पाहिले जात होते.

Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Leaders of Opposition Meeting : विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवारांची महत्वपूर्ण माहिती; ही बैठक शिमल्याऐवजी 'या' शहरात होणार

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निवडणुकीत पहिल्याच टर्मला मनसेचे नऊ नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर पक्षाची घाेडदौड सुरूच होती. विविध प्रश्नांवर ठोस भूमिका घेत शहर मनसेचे पदाधिकारी आंदोलने करत होते. त्याला कार्यकर्त्यांची मोठी साथ मिळत होती. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या टर्मला पक्षाचे चक्क २९ नगरसेवक विजयी झाले. काही काळ तर पालिकेतील विरोधी पक्ष म्हणूनदेखील मनसेला काम करण्याची संधी मिळाली.

पक्षाच्या विजयाचा हा आलेख असाच सुरू राहिला, तर विधानसभा, लोकसभेलादेखील मोठ्या प्रमाणात यश मिळू शकेल, असा अंदाज राजकीय मंडळींकडून केला जात होता. 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर पालिकेत विजयी झालेल्या नगरसेवकांना गळाला लावत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांमध्ये जे घडते तेच मनसेबाबतही घडले. पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक पक्षाचे पालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले.

Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Parbhani Loksabha Constituency News : हिंदुत्व, निष्ठा अन् ठाकरेंबद्दलची सहानुभूती खासदार जाधवांना तारणार...

कालांतराने इतर राजकीय पक्षांप्रमाणेच मनसेमध्ये ही अंतर्गत वादावादी सुरू झाली. काही कट्टर कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील लोकांना पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. परिणामी पक्षातील नाराजी अधिकच वाढत गेली. गेल्या काही महिन्यांमध्ये तर एकेकाळी शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारणारा पक्ष मनसेच होता का, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

पालिकेत नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या सभासदांनाच त्यांच्या पराभवानंतर पक्षातील महत्त्वाच्या पदांची जबाबदारी दिल्याने आम्हाला संधी मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित करत अनेकांनी पक्षापासून थोडे दूर राहणेच पसंद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावण्यात याव्यात, यासाठी (Pune MNS) पुणे मनसेच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. अनेकदा तर या आंदोलनांचे रूपांतर तोडफोडीत झाले होते. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून मुंबई, ठाणे येथे मनसेचे आंदोलन सुरू असताना पुणे शहरात मात्र त्याबद्दल काहीही भूमिका घेतली गेली नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. ठाणे शहरात मनसेच्या वतीने मराठी पाट्यांबाबत तीव्र आंदोलन सुरू असताना पुणे शहर मनसेच्या कार्यालयात मात्र शांतता होती.

पक्षाचे शहर पातळीवर काम करणारे असलेले पदाधिकारी यांच्यात असलेले मतभेद, गटाचे राजकारण आहे. असे गट आहेत. बाबू वागसकर, किशोर शिंदे यांचा गट आहे. वसंत मोरे एकाकी आहेत. साईनाथ बाबरांसोबत फारसे कोणी नसल्याचे दिसते. अनिल शिदोरे आता लांब झाले आहेत, तर अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांच्याकडेच सूत्रे आहेत. या दोघांशिवाय राज ठाकरे हे फार कोणाला महत्त्व देत नाहीत. परिणामी त्यांच्यात कोणती भूमिका घ्यायची याबाबत एकमत होत नाही.

दरम्यान, काही पदाधिकारी भूमिका घेतात; पण वरिष्ठ पातळीवरून विचारणा झाल्यास त्यापासून बाजूला होतात. पुण्यातील गटबाजीबाबत वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या गोष्टी घालूनही दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा देत ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या गटबाजीमुळे शहरातील पक्ष संपत चालला असल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Maharashtra Politics : ...तरीही पुरोगामी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षाच !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com