Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचं घर लुटलं, सीआयडी चौकशी होणार? बंगल्यातून तब्बल...
Pune News : महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून तब्बल वीस ते पंचवीस लाखांचे साहित्य गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात जुन्या काळातील ब्राँझचे दिवे, झुंबर, 4 एसी, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, 2 एलईडी टीव्ही अशा महागड्या साहित्यांसह अनेक वस्तू गहाळ झाल्या आहेत. मात्र याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्याउपर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करून नवीन साहित्य खरेदी प्रशासनाकडून करण्यात असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता या प्रकरणात काही सामाजिक संस्थांनी पुढे घेतली असून थेट सीआयडी ची चौकशी पर्यंत हा विषय गेला आहे.
पुणे महापालिका आयुक्तांचे मॉडेल कॉलनी येथे शासकीय निवासस्थान आहे. तत्कालीन पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे मे महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जुलै महिन्यात राजेंद्र भोसले यांनी आयुक्तांच्या बंगल्याचा ताबा सोडला. यानंतर नवनियुक्त आयुक्त नवकिशोर राम बंगल्यामध्ये राहण्यासाठी येण्यापूर्वी भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केली त्यादरम्यान बंगल्यातील बरचसे साहित्य गायब असल्याचे दिसून आले.
या पाहणीत जुन्या काळातील पितळे दिवे, झुंबर, चार एसी, ४५ आणि ६५ मीटरचे दोन एलईडी टीव्ही, रिमोट, रिमोट बेल्स, किचन टॉप, अॅक्वागार्ड सोफा, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट,खुर्च्या तसेच आवारातील झाडांच्या,फुलांच्या कुंड्या हे गायब झाले असल्याचं निदर्शनास आले .
हे साहित्य कुठे गेला असेल या विचारात अधिकारी पडले होते. मात्र याची वाच्यता न करता नवीन साहित्य करण्याचा निर्णय प्रशासनातून घेण्यात आला . याप्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून पालिकेत दबक्या आवारात चर्चा सुरू होती. मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे हे साहित्य नक्की कोण घेऊन गेले आणि पालिका प्रशासन याबाबत तक्रार देण्यास का टाळाटाळ करत आहे? असा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चौफेर सीसीटीव्ही तरीही साहित्य गायब!
महापालिका आयुक्तांचा बंगला मॉडेल कॉलनीत येथे जवळपास अर्धा एकर इतक्या जागेत आहे. बंगल्याच्या परिसरात चौफेर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. तसेच, महापालिकेचे सुरक्षारक्षक देखील त्या ठिकाणी चोवीस तास सुरक्षेसाठी असतात. असे असताना साहित्य कसे गहाळ झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी तब्बल दहा वर्षापूर्वी महापौर बंगल्यातून टीव्ही चोरीला गेला होता. तेव्हा, प्रशासनाने तक्रार दाखल केली होती. परंतु, आता साहित्य गायब होऊनही अद्याप चोर सापडलेला नाही.
बंगल्याची देखरेख कोणाकडे?
महापालिकेच्या मालिकेच्या मिळकतीचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. या बंगल्यात काही खरेदी करायची असल्यास भवन विभागा मार्फत हे काम केले जाते. त्यामुळे निवासस्थानातील साहित्याची यादी ठेवणे तसेच बंगला सोडताना किंवा नवीन अधिकारी बंगला घेताना ती तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र साहित्य गायब झाल्यानंतर आता त्याला जबाबदारी नक्की कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चोरी झाली का नाही, आयुक्त कन्फ्युज ?
याबाबत माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, "दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बंगला सोडला आहे. त्याआधारे राजेंद्र भोसले यांना बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. या बंगल्यात काय सामान होते याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्याकडे भरपूर साहित्य होते, तेच घेऊन आम्ही या ठिकाणी राहिला आलो. राहिला येण्यापूर्वी किचन आणि हॉलचे काम आम्ही करून घेतले आहे. मात्र या ठिकाणी कोणते सामान होते आणि ते सामान कुठे गेले याची कुणालाही माहिती नाही. याला भवन विभागाचे अभियंता याला जबाबदार आहेत. सामान कुठे गेले? याची चौकशी मी करणार आहे . लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.प्रशासकीय कामात अनेक समस्या आहेत त्यातलं ही देखील एक समस्याच आहे." असं नवल किशोर राम म्हणाले.
सीआयडी चौकशी
आयुक्तांच्या निवासस्थानी २० लाख रुपयांच्या किमती वस्तूंची चोरी होते. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. जर महापालिका आयुक्तांचा बंगला सुरक्षित नसेल तर सामान्य नागरीकांची सुरक्षा रामभरोसे राहणार हे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. आपण या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे तातडीने तक्रार दाखल करून या प्रकाराची सी आय डी चौकशी होण्यासाठी आग्रह धरावा कारण यामध्ये जसे बाहेरचे चोर असू शकतात तसे आतले दरोडेखोर ही सामील असू शकतात. आपण तातडीने कारवाई अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.