

PMC News : पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता. २३) अर्ज भरताना फक्त भाजपच्याच उमेदवारांचे अर्ज सादर झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे. या निवडणुकीत भाजपने महिलांना जास्त संधी दिली आहे. यापदाची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. त्यानंतर विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, नाव समिती यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी मुदत होती.
यात भाजपतर्फे विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी स्वरदा बापट, उपाध्यक्ष पायल तुपे, शहर सुधारणा समिती अध्यक्षपदासाठी स्मिता वस्ते, उपाध्यक्षपदासाठी सपना छाजेड, महिला व बाल कल्याण समितीसाठी अल्पना वरपे, उपाध्यक्ष तन्वी दिवेकर, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी नारायण गलांडे, उपाध्यक्षपदासाठी दिनेश माथवड, शिक्षण समितीसाठी अरुण राजवाडे, उपाध्यक्ष अतुल तरवडे आणि नाव समितीच्या अध्यक्षपदासाठी पल्लवी जावळे, उपाध्यक्षपदासाठी सुनील पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या सहापैकी चार समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांना संधी मिळाली आहे. तर तीन महिलांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
प्रत्येक विषय समितीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचे एक सदस्य आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना उमेदवारी अर्ज भरायचा असला तरी त्यांच्याकडे एक सदस्य कमी पडत आहे. उमेदवारास सूचक मिळाला तरी अनुमोदक मिळणार नाही किंवा सूचक अनुमोदक तयार केले तरी उमेदवार कोणाला करायचा असा पेच निर्माण झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला अर्ज भरता न आल्याने या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती त्यानंतर आता सहा विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकाही बिनविरोध होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.