Pune Municipal Corporation Contract Staff Hiring
Contract workers at Pune Municipal Corporation offices assisting officials to streamline daily administrative operations and improve efficiency.Sarkarnama

PMC recruitment : पुणे महापालिकेत महापौरांपासून गटनेत्यांपर्यंत 'स्पेशल टीम'; 40 कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधींचा खर्च

PMC contract staff hiring : कुशल कामगारांसाठी दरमहा ३१ हजार १४२ रुपये, तर अकुशल कामगारांसाठी ३० हजार ४६२ रुपये २६ दिवसांच्या कामाच्या हिशेबाने वेतन निश्चित करण्यात आले आहे. या दरामध्ये सेवा शुल्काचा समावेश असून, मुख्य कामगार अधिकार्‍यांकडून प्राप्त दर आणि विशेष भत्त्यांनुसार १२ महिन्यांचा एकूण खर्चाचा अंदाज तयार करण्यात आला आहे.
Published on

Pune News, 22 Mar : पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

या प्रस्तावानुसार महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते तसेच विविध पक्षांच्या गट नेत्यांच्या कार्यालयांसाठी एकूण ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात २० कुशल आणि २० अकुशल कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. या कामासाठी मे. जीआयएस वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील प्रस्ताव नगरसचिवांकडे सादर केला असून, तो स्थायी समितीमार्फत मुख्य सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेतील विविध पदाधिकाऱ्यांची कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६७ (३) (क) नुसार ही नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Pune Municipal Corporation Contract Staff Hiring
Pune Land Scam : तब्बल 152 अधिकारी अडचणीत, जमीन घोटाळा भोवणार! 38 हजार सातबारा...

प्राप्त कोटेशननुसार कुशल कामगारांसाठी दरमहा ३१ हजार १४२ रुपये, तर अकुशल कामगारांसाठी ३० हजार ४६२ रुपये २६ दिवसांच्या कामाच्या हिशेबाने वेतन निश्चित करण्यात आले आहे. या दरामध्ये सेवा शुल्काचा समावेश असून, मुख्य कामगार अधिकार्‍यांकडून प्राप्त दर आणि विशेष भत्त्यांनुसार १२ महिन्यांचा एकूण खर्चाचा अंदाज तयार करण्यात आला आहे. यात पर्यवेक्षकीय शुल्काचाही समावेश आहे.

Pune Municipal Corporation Contract Staff Hiring
Ashok kharat land scam : अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोचं कनेक्शन आलं समोर...

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी आणि कामाची तातडी लक्षात घेता, संकीर्ण निधीमधून १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करून हे काम देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या प्रस्तावानुसार संबंधित ठेकेदाराकडून १ मार्च २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत, म्हणजेच एक वर्षासाठी सेवा घेतली जाणार आहे. तसेच कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम १९७० अंतर्गत किमान वेतनात वेळोवेळी होणारी वाढ लागू करण्यास आणि ठेकेदाराशी करारनामा करण्यासही मान्यता घेतली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com