PMC expansion : प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांचा छळ होतोय..., महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसची फडणवीसांकडे मोठी मागणी

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेच्या वाढत्या हद्दीमुळे नागरीकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार काँग्रेस नेते माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देऊन, पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून दोन स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली आहे.
Devendra Fadnavis, Pune Congress
Devendra Fadnavis, Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 May : पुणे महानगरपालिकेच्या वाढत्या हद्दीमुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरीकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार काँग्रेस नेते माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देऊन, पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून दोन स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली आहे.

सध्या पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३८ नवीन गावांचा समावेश झाल्याने महापालिकेची एकूण क्षेत्रफळ सुमारे ४५० चौ.कि.मी. पर्यंत वाढली आहे. या प्रचंड क्षेत्रात नागरी सेवा पुरवणे कठीण झाले असून, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य सेवा व वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांवर ताण वाढला आहे.

बालगुडे म्हणाले, "पुण्याची लोकसंख्या आता ४० लाखांच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत एकाच महापालिकेवर संपूर्ण शहराचा भार टाकणे शहाणपणाचे नाही. मुंबईचे सहा भागात विभाजन झाले आहे, तसेच पुणे शहराचेही किमान दोन महानगरपालिका करणे ही आता काळाची गरज आहे."

Devendra Fadnavis, Pune Congress
Vaishnavi Hagavane : सुप्रिया सुळेंना विरोध अन् सुनेत्रा पवारांना समर्थन..., वैष्णवी हगवणेच्या दीराची 'ती' पोस्ट व्हायरल होताच नेटकरी संतापले

पुणे महापालिका ही राज्यातील सर्वाधिक कर आकारणी करणारी संस्था असूनही नागरिकांना समाधानकारक सुविधा मिळत नाहीत. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांचा छळ होत असून, "केवळ कर भरायचा आणि सुविधा नाहीत," अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis, Pune Congress
Vaishnavi Hagwane Case : घोड्यावर बसून सुशील हगवणेचा माज... म्हणे, "बापाच्या जीवावर करतोय"; मुजोरीचा VIDEO व्हायरल

पूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाची घोषणा केली होती, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने हा निर्णय घेऊन पुणेकरांच्या अडचणींना न्याय द्यावा, अशी मागणी संजय बालगुडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com