Vaishnavi Hagavane : सुप्रिया सुळेंना विरोध अन् सुनेत्रा पवारांना समर्थन..., वैष्णवी हगवणेच्या दीराची 'ती' पोस्ट व्हायरल होताच नेटकरी संतापले

Vaishnavi Hagavane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी सुनांचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबियांवरोधात तीव्र संताप राज्यभरातून व्यक्त केला जात आहे. शिवाय या सर्व घटनेनंतर हगवणे परिवाराला मोठ्या प्रमाणात पैशाचा माज असल्याचंही उघडकीस आलं आहे.
Pune Hagavane family controversy
Pune Hagavane family controversySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 May : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी सुनांचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबियांवरोधात तीव्र संताप राज्यभरातून व्यक्त केला जात आहे. शिवाय या सर्व घटनेनंतर हगवणे परिवाराला मोठ्या प्रमाणात पैशाचा माज असल्याचंही उघडकीस आलं आहे.

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना राजकीय पाठबळ असल्याचंही उघडकीस आलं आहे. मात्र, वैष्णवीच्या मृत्यूनंतर या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची राष्ट्रवादीकडून नोटीस काढण्यात आली होती.

दरम्यान, सुनांचा छळ करणारं कुटुंब अशी हगवणे यांची ओळख सबंध महाराष्ट्रात झाली असतानाच आता वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याने 2024 मध्ये अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन करताना केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Pune Hagavane family controversy
Beed Accident : बीड हादरलं! मध्यरात्री सहा जणांवर काळाचा घाला, अपघातातून बचावले पण कंटेनरने चिरडलं

पोस्टमध्ये नेमकं काय?

या पोस्टमध्ये त्याने सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया, असं लिहिलं आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. सुशील हगवणे हा मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत आल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने सुप्रिया सुळेंऐवजी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

बारामतीत नणंद विरूद्ध भावजय अशी लढत झाली होती. यावेळी शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे आणि सुन सुनेत्रा पवार असं चित्र निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, "यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया. सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया, एक मत सुनेसाठी..."

Pune Hagavane family controversy
NCP Politics : "शरद पवारांनी अजितदादांना समर्थन द्यावं..." राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांवर कृषीमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

तर घरातील दोन्ही सुनांचा छळ करून बाहेर केवळ देखाव्यासाठी सुनांचं कौतुक करणाऱ्या सुशील हगवणेच्या पोस्टवर नेटकरी कमेंटच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण, असं हगवणे कुटुंब वागत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सासरा, दीर, सासू, नणंद आणि वैष्णवीचा नवरा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com