PMC News: पाच कोटींचा निधी दुसऱ्या प्रभागात; भाजपचा विरोध, आता काँग्रेसनेही दंड थोपटले! आयुक्तांकडे धाव

PMC Fund Allocation: पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील पाच कोटींचा विकासकामांचा निधी दुसऱ्या प्रभागात वळविल्याने भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही विरोध केला आहे.
pmc
pmcSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात न घेता विकासकामांचा निधी दुसऱ्या प्रभागात वळविण्याच्या निर्णयावरून पुणे महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. कासेवाडी-डायसप्लॉट प्रभाग क्रमांक २२ मधील निधी रविवार पेठ-नानापेठ प्रभाग क्रमांक २३ मध्ये वर्ग करण्याच्या निर्णयाला सुरुवातीला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. आता काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनीही या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने विरोधाची धार वाढली आहे.

सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक २२ मधील सामाईक विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी प्रभाग क्रमांक २३ ड मध्ये नगरसेवक विशाल धनवडे यांच्याकडे वळविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रक्रियेत संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेप आता घेतला जात आहे.

ठराव तातडीने रद्द करा

रफिक शेख यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. निधी वर्गीकरणाचा निर्णय संबंधित नगरसेवकांच्या संमतीशिवाय घेण्यात आला असून, अशा प्रकारे परस्पर निधी वळविणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे निधी वर्गीकरणाचा ठराव तातडीने रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

pmc
Hasan Mushrif: अजितदादांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा डाव? मुश्रीफांनी विरोधकांना सुनावले; शरद पवार, सुनेत्रावहिनींबाबत मोठे विधान

अन्य प्रभागातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा आक्षेप ठरावाच्या प्रक्रियेवर घेण्यात आला आहे. निधीचे वर्गीकरण करताना संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या ठरावावर असणे आवश्यक असताना, अन्य प्रभागातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे हा ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

pmc
Teacher Training: शिक्षकांनो, तयारीला लागा! वरिष्ठ-निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण महत्वाच्या सूचना जाहीर; 200 गुणांचे होणार मूल्यमापन

प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक असे एकूण चार नगरसेवक आहेत. मात्र, निधी दुसऱ्या प्रभागात वळविण्यापूर्वी या चारही नगरसेवकांची संमती घेण्यात आली नसल्याचे शेख यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

प्रशासन अडचणीत?

त्यामुळे हा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांनी त्याची अंमलबजावणी थांबविण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनंतर काँग्रेसच्या नगरसेवकानेही विरोध केल्याने निधी वर्गीकरणाचा निर्णय महापालिका प्रशासनासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.