NCP vs BJP : भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपटले; निधीचा मुद्दा पेटला, थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार प्रकरण...

Pune Municipal Corporation, NCP corporators, development fund, BJP Pune : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी शून्य; भाजपविरोधात आक्रमक आंदोलन, नागरिकांवरील अन्यायाचा आरोप.
BJP vs NCP
BJP vs NCPSarkarnama
Published on
Updated on

PMC News : महायुतीत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुण्यात मिठाचा खडा पडला आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांच्या प्रभागातील निधी शून्य केल्याने पक्षाने सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील निधी शून्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपकडून एकापाठोपाठ दोन नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. त्यानंतर शहरातील पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी तातडीने बैठक घेतली.

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि सुनिल टिंगरे यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या भूमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. निधी शून्य करण्यात आलेल्या प्रभागातील नगरसेवकांनी भाजपवर गंभीर आरोप केले. प्रभागातील निधी शून्य करणे म्हणजे संबंधित नागरिकांवर अन्याय केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

BJP vs NCP
Shiv Sena case : सुप्रीम कोर्टात राणा प्रकरण शिंदेंना अडचणीत आणणार? ठाकरेंच्या वकिलांनी टाकलेला डाव महाराष्ट्राचे राजकारण फिरविणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. बैठकीनंतर नगरसेवकांसह नेत्यांनी महापालिकेतील पायऱ्यांवर भाजपविरोधात आंदोलन केले. तसेच भाजपविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

BJP vs NCP
Tukaram Mundhe news : "हे डिपार्टमेंट मी नीटच करतो", असं CM फडणवीस म्हणाले अन् काही तासांतच नियुक्ती! तुकाराम मुंढे FDA मध्ये येण्याआधी पडद्यामागं काय घडलं?

दरम्यान, नगरसेवक टिंगरे आणि बालवडकर यांच्या प्रभागातील प्रत्येकी १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या दोन नगरसेवकांच्या प्रभागातील निधीवर राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने आक्रमकपणे भाजपच्या या भूमिकेला विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com