Pune : शहराचं 12 हजार कोटींचं बजेट सादर; निवडणुकीच्या तोंडावर 'पुणेकरांना' मोठा दिलासा

Pune : महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025-26 साठी शहराचा अर्थसंकल्प मांडला. यात आयुक्तांनी कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे सलग नव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही.
PMC
PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025-26 साठी शहराचा अर्थसंकल्प मांडला. एकूण 12 हजार 618 कोटींचा हा अर्थसंकल्प ठरला. गत वर्षीच्या तुलनेत हा यंदाचा अर्थसंकल्प एक हजार कोटींनी अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आयुक्तांनी पायाभूत सुविधांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय वैशिष्ट्य म्हणजे आयुक्तांनी कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे सलग नव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर झाल्याने ते प्रशासकाचे अंदाजपत्रक आहे की निवडणुकांचे? या बाबत चर्चा आहे.

30 हजार कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव :

अनेक माजी नगरसेवकांनी, विद्यमान आमदारांनी आणि माजी आमदारांनी आपल्या प्रभागातील विकासकामे कामे सुचवली होती. सुरूवातीला पालिका आयुक्त फक्त सत्ताधारी नेत्यांचेच प्रस्ताव स्वीकारत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही विकास कामे सुचवली होती.

महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेत्यांनी सुचवलेल्या विकास कामांची ही किंमत 30 हजार कोटींवर गेली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प 12 हजार कोटींचा असताना सर्वपक्षीय नेत्यांनी 30 हजार कोटींची विकास कामे कशी सुचवली? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता आयुक्तांनी कोणाकोणाच्या मागण्या मान्य केल्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

PMC
Pune Police Attack : चाकणमध्ये पोलिसांवरच दरोडेखोरांचा हल्ला, दोन गोळ्या झाडल्या...

आता पुणेकरांना मीटर प्रमाणे पाणीपट्टी :

पुणे (Pune) महापालिकेने समान पाणीपुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचे बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली आहे.

एकतानगरसाठी तरतूद :

गेल्या वर्षी पावसामध्ये शहरातील काही भागांना पुराचा फटका बसला होता. यात सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरचा समावेश होता. या भागातील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच पुराचा होणारा अधिकचा धोका टाळण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे

PMC
Nashik Pune semi high-speed rail : 'नाशिक-पुणे सेमी हायस्पीड' रेल्वे मार्गाबाबतच्या सर्वपक्षीय कृती समितीत प्रकल्पाचे प्रवर्तक शिवाजीराव आढळराव पाटीलच नाही!

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे :

1. स्थानिक संस्था करातुन 545 कोटी

2. ⁠जीएसटी मधुन 2 हजार 701 कोटी

3. ⁠मिळकत करातुन 2 हजार 847 कोटी

4. ⁠बांधकाम विकास शुल्कातुन 2 हजार 899 कोटी

5. ⁠पाणीपट्टी मधुन 618 कोटी

6. ⁠शासकीय अनुदान 1 हजार 633 कोटी

7. ⁠कर्ज रोखे 300 कोटी

8. ⁠इतर 975 कोटी रुपये जमा होणार आहेत

या गोष्टींवर महापालिका करणार खर्च :

1. इमारतींच्या बांधकामासाठी 490 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

2. ⁠रस्त्यांसाठी 1 हजार 126 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

3. ⁠नदी सुधारणा योजनेसाठी 396 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

4. ⁠आरोग्यासाठी 569 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

5. ⁠पाणीपुरवठ्यासाठी १1 हजार 665 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

6. ⁠घनकचरा व्यवस्थापनासाठी 142 कोटींची तरतूद केली आहे

7. ⁠महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांसाठी 623 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या तरतुदी :

1. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार.

2. ⁠मंहमदवाडी येथे नवीन क्रीडा संकुल उभारणार.

3. ⁠नेहरु स्टेडीयमची सुधारणा करणार.

4. ⁠साथ रोगांसाठी प्रयोगशाळा उभारणार.

5. ⁠आपत्कालीन कक्ष उभारणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com