Pune Mahapalika : पुणे महापालिकेत श्रीनाथ भिमालेंच्या 'अष्टप्रधान' मंडळाची चर्चा : 15 हजार कोटींच्या मॅनेटमेंटसाठी उभी केली खास 'सिस्टिम'

Pune Mahapalika : पुणे महानगरपालिकेत श्रीनाथ भिमाले यांच्या स्थायी समितीवर कुटुंबीय आणि निकटवर्तीयांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे.
Shrinath Bhimale
Shrinath BhimaleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेमध्ये सध्या भाजपच्या फॅमिली राजची चर्चा सुरू आहे. निवडणुकीत अनेक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. पण कारभार मात्र त्यांच्या कुटुंबातील पुरुष मंडळीच बघत असल्याचं चित्र आहे. काही वरिष्ठ पुरुष नगरसेवकही कुटुंबातील मंडळींना सोबत घेऊन कारभार करत आहेत. यात सर्वात जास्त चर्चा स्थायी समितीमधील अष्टप्रधान मंडळाची सुरु आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत 165 पैकी तब्बल 119 जिंकत भाजपने एकहाती बहुमत मिळवले. त्यामुळे महापालिकेत सध्यातरी भाजपचीच निर्विवाद सत्ता राहणार आहे. मात्र ही सत्ता राबवताना भाजप काही नवीन प्रथा सुरु करत असल्याचे दिसून येते. यात महिला नगरसेवकांचे कुटुंबीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत किंवा कुटुंबातील व्यक्ती बैठकांना हजेरी लावत आहेत. प्रभागांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचे बघायला मिळते.

अशात पुणे महानगरपालिकेतील श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्वातील स्थायी समितीचा कारभारही चर्चेत आला आहे. 15 हजार कोटींच्या बजेटचे मॅनेजमेंट करण्यासाठी भिमाले यांच्या दिमतीला त्यांचा लहान भाऊ, मुलगा, दोन सेवानिवृत्त कर्मचारी आणि चार 'खास' कार्यकर्त्यांते असे अष्टप्रधान मंडळ आहे. एखादे काम घेऊन अध्यक्षापर्यंत पोहोचायचे असल्यास या अष्टप्रधान मंडळातील कार्यकर्त्यांचे अडथळे पार करूनच जावे लागत असल्याचं सांगितले जाते.

Shrinath Bhimale
Pune Bjp : भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये टक्केवारीवरुन राडा? कोणी लावलं भांडण? गणेश बिडकरांनी थेट सांगितलं

स्थायी समितीची बैठक असो की श्रीनाथ भिमाले यांचे अध्यक्षीय दालन असो, हे 'अष्टप्रधान' मंडळ सर्वत्र आपणच अध्यक्ष असल्याप्रमाणे वावरत असल्याने महापालिका वर्तुळात वेगळीच कुजबुज सुरू आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधीऐवजी त्यांच्या कुटुंबीयांकडून निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची तक्रार काही अधिकाऱ्यांकडून अनौपचारिकरीत्या व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com