Pune Bjp : भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये टक्केवारीवरुन राडा? कोणी लावलं भांडण? गणेश बिडकरांनी थेट सांगितलं

महापालिका भवनात दोन नगरसेविकांमध्ये टक्केवारीवरुन भांडण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
Published on
Updated on

पुणे: बाणेर येथे आदिवासी महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या तीन कोटीच्या निविदेवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकेमध्ये महापालिकेत शिव्यांची लाखोली वाहत झालेल्या जोरदार भांडणावर आज (ता. १७) पडदा टाकण्यात आला. या दोघींमध्ये तिसऱ्याच व्यक्तीने गैरसमज निर्माण करून भांडणे लावून दिली असा दावा सभागृहनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
Co-Operative Department: राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र ‘सहकार’ विभाग; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्‍या भवन विभागात नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात जोरदार भांडणे झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असताना टक्केवारी वरून ही भांडणे झाल्याची चर्चा महापालिकेत रंगली होती. दरम्यान, हा वाद झाल्यानंतर नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांना हे प्रकरण मिटविण्याची सूचना देण्यात आली होती.

PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
Priyanka Chaturvedi News : उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रियांका चतुर्वेदींची भूमिका, महिला आरक्षण बिल नामंजूर होताच म्हणाल्या, 'मी...'

आज महापालिकेत गणेश बिडकर यांच्या दालनात चिमटे, काळे, नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे यांची बैठक झाली. या बैठकीतही काही प्रमाणात वादावादी झाली. पण तुमच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. जर तुम्ही हा वाद संपविला नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असे दोघांनाही सांगण्यात आले. तसेच यापुढे काही अडचणी असतील तर थेट माझ्याशी चर्चा करावी अशी सूचना देण्यात आली.

PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
Vikas Lawande controversy : ‘घुसखोर’ वक्तव्याने पेटली ठिणगी; राष्ट्रवादीच्या लवांडेंविरोधात कारवाईच्या मागणीचा जोर

पत्रकार परिषदेत गणेश बिडकर म्हणाले, ‘‘चिमटे आणि काळे यांच्यामध्ये गैरसमजातून वाद निर्माण करण्यात आला. काळे यांच्यासोबत पूर्वी ज्या कार्यकर्त्याचा वाद झाला होताच, त्यानेच तिऱ्हाईत व्यक्तीने हा वाद निर्माण केला. यात टक्केवारीचा कोणताही वाद नाही. भाजप हा एक परिवार असून, दोघींचा वाद संपला आहे.

PMC Corporators Rohini Chimte, Rajashri Kale Row
Pune BJP : पुण्यात भाजपच्या 'झेरॉक्स नगरसेवकांचा' दबदबा वाढला; दमदाटीपुढे अधिकारी हतबल

'तो' कार्यकर्ता सोबत असतो ही अन् नसतो ही

व्हायरल व्हिडिओमध्ये राजश्री काळे यांना शिवीगाळ करणारा कार्यकर्ता तुमचा आहे का? असे चिमटे यांना विचारण्यात आल्यानंतर तो माझा कार्यकर्ता नाही असे सांगितले. मग तो तुमच्या सोबत असतो का असे विचारल्यानंतर तो कधी सोबत असतो कधी नसतो असे उत्तर दिल्याने नेमका कार्यकर्ता आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com