PMC Standing Committee : स्थायी समितीसाठी मजबूत फिल्डिंग;पुणे भाजप खेळणार मोठा डाव, नगरसेवकांचे बैठकीकडे लक्ष

Pune BJP Meeting : महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समितीच्या निवडणुकीकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. भाजपची बैठकीत नावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
BJP Win ZP and Panchayat Samiti Elections in Sindhudurg
BJP Win ZP and Panchayat Samiti Elections in SindhudurgSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी भाजपच्या अनुभवी नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यावर कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे. ही बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. सदस्यांची निवड करताना समाविष्ट गावे, आठ विधानसभा मतदारसंघ आणि नगरसेवकांचे कर्तृत्व हा विचार केला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे. यासाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत कार्यपत्रिकेवर स्थायी समितीसह सात विषय समित्यांच्या सदस्य निवडीचा प्रस्ताव होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही सर्वसाधारण सभा तहकूब केल्याने सदस्यांची निवड होऊ शकलेली नाही. ही सदस्यांची निवड आता शुक्रवारी (ता.13) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

शुक्रवारी स्थायी समिती,शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती, क्रीडा समिती, नाव समिती, शिक्षण समिती आणि विधी समिती या सात समिती मधील सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समिती साठी 16 सदस्य आहेत. तर उर्वरित सहा समित्यांसाठी प्रत्येकी 13 सदस्यांची निवड करावी लागणार आहे. या सर्वांमध्ये स्थायी समिती महत्त्वाची असून पुणे शहराच्या विकासाचे अर्थकारण या ठिकाणी चालते. त्यामुळे या समितीमध्ये आपली वर्णी लागावी याचे सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

BJP Win ZP and Panchayat Samiti Elections in Sindhudurg
PMC News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवकांचं आवडत्या कर्मचाऱ्यासाठी 'लॉबिंग', प्रशासनाची तारेवरची कसरत

समाविष्टा गावांना मिळणार संधी

स्थायी समितीमध्ये 16 पैकी 12 सदस्य भाजपचे असणार आहेत. पहिल्या वर्षी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अद्याप भाजपने घेतलेला नाही. पण स्थायी समितीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघातून दोन तर काही मतदारसंघातून एक नाव स्थायी समितीमध्ये जाईल. समाविष्ट गावांमध्ये विकास कामे करावे लागणार आहेत. त्यामुळे त्या भागात नियोजनबद्ध पद्धतीने विकास निधी जाणे आवश्यक आहे. या गावातून देखील प्रतिनिधित्व भाजपकडून दिले जाण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांकडून पदाधिकाऱ्याची भेट

यासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून आपापल्या परीने प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी नेते यांना भेटून संधी द्यावी यासाठी शब्द टाकला जात आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर समितीची बैठक बुधवारी (ता. 11) रात्री किंवा गुरुवारी (ता. 12) होणार आहे. यामध्ये चर्चा झालेली नावे प्रदेशाकडे पाठवले जातील. भाजप प्रदेश कडून अंतिम केलेली नावे ही सर्वसाधारण सभेत बंद पाकीटातून सादर केली जातील. त्यानंतर या नावांची घोषणा केली जाणार आहे.

BJP Win ZP and Panchayat Samiti Elections in Sindhudurg
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंवरची मोठी नामुष्की टळली, हायकोर्टाकडून मोठा दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com