PMC News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवकांचं आवडत्या कर्मचाऱ्यासाठी 'लॉबिंग', प्रशासनाची तारेवरची कसरत

Pune Municipal Corporation News: पुणे महापालिकेची निवडणूक होऊन महापौरांची निवड झाली आहे. त्यामुळे प्रशासक राजवट संपली असून, आता पावणे चार वर्षानंतर पुन्हा नगरसेवकांच्या हातामध्ये कारभार गेला आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांनी प्रभागात कामाला सुरुवात केली आहे.
pmc
pmcsarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रभागात कामे करताना आपल्या ऐकण्यातील कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आरोग्य निरीक्षक असला पाहिजे यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. हे लाडके कर्मचारी आपल्या हद्दीतील क्षेत्रीय कार्यालयात यावेत यासाठी प्रशासनाकडे पत्र देण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक होऊन महापौरांची निवड झाली आहे. त्यामुळे प्रशासक राजवट संपली असून, आता पावणे चार वर्षानंतर पुन्हा नगरसेवकांच्या हातामध्ये कारभार गेला आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांनी प्रभागात कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन प्रशासनाला त्याबाबत सूचना देऊन कामे करून घेतली जात आहेत.

नगरसेवकांना ‘स’ यादीतून मोठा निधी मिळतो, तो प्रभाग स्तरावर खर्च केला जातो. हा निधी योग्य ठिकाणी खर्च करणे, कामे वेगात पूर्ण होणे आवश्यक असल्याने क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता हे सक्षम असला पाहिजे. तो नगरसेवकांनी सांगितलेली कामे वेळेत व त्यांच्या पद्धतीने करून देणारा असला पाहिजे अशी अपेक्षा ‘माननियां’ची असते.

ड्रेनेज, पाणी पुरवठा, रस्ते, विद्युत व्यवस्था, भवन यासह अन्य कामासाठी हे कनिष्ठ अभियंता महत्त्वाचा ठरतो. खर्चाचे पूर्वगणनपत्रक कसे तयार करायचे यामध्ये तरबेज असणार कनिष्ठ अभियंता हा नगरसेवकांच्या फायद्याचा ठरतो. त्यामुळे अशा अभियंत्यांची प्रभागात बदली व्हावी यासाठी प्रयत्‍न सुरु झाले आहेत. काही अभियंते स्वतः नगरसेवकांना भेटून त्यांचा वशिला लावत आहेत.

pmc
Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांत पाटील 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिकाऱ्यांची 'ऑन द स्पॉट' झाडाझडती

त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात स्वच्छता, कचरा संकलन, रस्त्याचे झाडणकाम यासह अन्य कामांवर सहाय्यक आरोग्य निरीक्षकाचे लक्ष असते. प्रभाग स्वच्छ ठेवायचा असल्याचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक हा कामाचा असेल तर नगरसेवकांचा त्रास कमी होतो.

तसेच प्रशासक काळात अनेक सहाय्यक आरोग्य निरीक्षकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांची कामे केलेली नाहीत. त्यामुळे त्या प्रभागात नगरसेवक झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून आता निष्क्रीय सहाय्यक आरोग्य निरीक्षकाची बदली करून चांगली कर्मचारी द्यावा यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

pmc
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंवरची मोठी नामुष्की टळली, हायकोर्टाकडून मोठा दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com