PMC Election : ठरलं! सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटन अन् सायंकाळी होणार पालिका निवडणुकीची घोषणा!

Devendra Fadnavis : पुणे महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होत असून, यानंतर लगेचच पालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Chief Minister Devendra Fadnavis inaugurating and laying foundation stones for major Pune Municipal Corporation development projects ahead of the anticipated PMC election announcement.
Chief Minister Devendra Fadnavis inaugurating and laying foundation stones for major Pune Municipal Corporation development projects ahead of the anticipated PMC election announcement.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहेत. त्यापूर्वी सत्ताधारी भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्याच्या अगदी तोंडावर, भविष्यातील मतांची पेरणी करण्यासाठी पुण्यात तब्बल 3000 कोटी रुपयांच्या विकासकामांचे नारळ फोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या उद्या सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील 60 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सत्ताधारी लगबगीने उरकून घेत आहेत.

नागपूर अधिवेशन उरकल्यानंतर लगोलग महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. एकदा आचारसंहिता लागू झाल्या नंतर कोणत्याही प्रकारची उद्घाटने किंवा नवीन कामांची घोषणा करता येत नाही. त्यामुळेच ही कायदेशीर अडचण लक्षांत घेता सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल 3000 कोटींच्या भूमिपूजन करण्यात येणार आहे. नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 15 डिसेंबरला हा कार्यक्रम करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नक्की असली तरी, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार की नाही, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित लोकार्पण कार्यक्रमांमध्ये पुणे शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी 842 कोटी रुपयांचा मेगा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 450 कोटींच्या 20 नवीन पाण्याच्या टाक्या तसेच वितरण व्यवस्था, पुणेकरांच्या सुरक्षेसाठी 53 कोटींचे अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, आरोग्य सेवेला मजबुती देणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन नवीन विंग्ससाठी 130 कोटी, सायकलस्वारांसाठी जागतिक दर्जाचा 145 कोटींचा सायकल ट्रॅक, तसेच खराडी, बाणेर आणि चांदणी चौक येथे 25 कोटींची तीन अग्निशमन केंद्रे यांचा समावेश आहे. याशिवाय नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत आणि इतर सांडपाणी प्रकल्पही या यादीत आहेत.

या कार्यक्रमात भूमिपूजन होणारे महत्त्वाचे प्रकल्प

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठ चौक (आचार्य आनंद ऋषिजी महाराज चौक) आणि बिंदू माधव चौक येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी 150 कोटी, अमृत-2 योजने अंतर्गत वडगाव येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी 200 कोटी, शेवाळवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 35 कोटी आणि केशवनगर-मुंढवा भागातील पाणीपुरवठा जाळ्यासाठी 27 कोटी असे एकूण 413 कोटींचे नवे प्रकल्प.

Chief Minister Devendra Fadnavis inaugurating and laying foundation stones for major Pune Municipal Corporation development projects ahead of the anticipated PMC election announcement.
Pune BJP: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावला जोर, काही मुलाखती एका मिनिटात उरकल्या तर काही पाच मिनिटांपर्यंत...

एकूण 900 कोटींहून अधिक किमतीच्या सुरू असलेल्या कामांसह आणि 413 कोटींच्या नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासह भाजपने (BJP) निवडणुकीपूर्वी पुण्याच्या विकासाचा ठोस अजेंडा जनतेसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा सर्व आटापिटा महापालिका निवडणुकीसाठी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Chief Minister Devendra Fadnavis inaugurating and laying foundation stones for major Pune Municipal Corporation development projects ahead of the anticipated PMC election announcement.
PMC Election: शिंदेंच्या सेनेत दुफळी? भाजपशी युतीवरून धंगेकर, भानगिरे आमने सामने!

दरम्यान महापालिकेच्या (PMC) रखडलेल्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होईल. 15 डिसेंबरला आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून, त्यानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातीला 14 किंवा 15 जानेवारी रोजी मतदान होऊ शकते. त्यामुळे सोमवारी 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटनांचा कार्यक्रम झाल्यानंतर निवडणुका लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com