PMC Election 2026 : बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात

Pune Municipal Election 2026 : या भाजपच्याच बंडखोर उमेदवारांना प्रवेश देत अजित पवारांनी भाजप समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने देखील या बंडोबा विरोधात रणनीती आखली असून भाजपाचा पारंपारिक मतदार पक्षासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
devendra Fadnavis, Ajit Pawar
devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Jan : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या पाहायला मिळाली. 165 जागांसाठी तब्बल 2300 इच्छुक भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या गर्दीमधून उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक निकष लावल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे अनेक भाजप कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली. यामध्ये काही माजी नगरसेवकांचा देखील सामावेश होता. यातील काही नाराज माजी नगरसेवकांनी थेट भाजपची साथ सोडून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे भाजपच्या बंडखोरांना राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. मात्र आता या बंडोबांचे बंड मोडीत काढण्यासाठी भाजपने देखील ताकद लावली आहे. सुस- बाणेर-पाषाण या प्रभागातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना तिकीट नाकारून बालवडकर यांना संधी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

devendra Fadnavis, Ajit Pawar
Thane Municipal Election : शिंदेंच्या उमेदवाराच्या अर्जातही त्रुटी, पण बाद केले फक्त मनसे, वंचित अन् ठाकरेंच्या शिवसेनेचे, निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपात केल्याचा आरोप

या ठिकाणी भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. सर्व्हेमध्ये लहू बालवडकर आघाडीवर असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र अमोल बालवडकर यांनी आपण भाजपला दाखवून देऊ असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप देखील या प्रभागात पूर्ण ताकतीनिशी उतरणार आहे.

बालवडकर यांच्याबरोबरच भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आरपीआय आठवले गटाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे या माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.राष्ट्रवादीने प्रकाश ढोरे आणि अर्चना मुसळे यांना औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी दिली आहे.

devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar NCP : 'ते आमचे उमेदवारच नव्हेत..' गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर अजित पवारांचं भलतंच स्पष्टीकरण...

तर डॉ. धेंडे यांच्या पत्नी नंदिनी धेंडे यांना फुलेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्रमांक २ मधून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी असणार आहेत. या प्रवेशापूर्वी सर्वप्रथम भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव, आणि शंकर पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पक्षात प्रवेश करत भाजपविरुद्ध दंड थोपटले होते.

या भाजपच्याच बंडखोर उमेदवारांना प्रवेश देत अजित पवारांनी भाजप समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने देखील या बंडोबा विरोधात रणनीती आखली असून भाजपाचा पारंपारिक मतदार पक्षासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com