Pune: नेते सोडून गेले तरी निष्ठावंत पाठीशी! पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी वसंत मोरेंकडून 'मातोश्री दर्शन' मोहीम

Pune News, Sachin Ahir, Shiv Sena UBT: पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला. दरम्यान, वसंत मोरे यांनी निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी मातोश्री दर्शन आणि उद्धव ठाकरे भेटीचे आयोजन केले आहे.
Vasant More,  Uddhav Thackeray
Vasant More, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी मंगळवारी (३० जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताच त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला असून, या अनपेक्षित घडामोडीमुळे पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, कालपर्यंत पुण्यातील पक्ष संघटना, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बैठकांचे नियोजन करणारे सचिन अहिर अचानक शिंदे गटात कसे गेले, या प्रश्नाने पक्षाचे कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील गळतीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, नुकतेच पक्षाच्या सहा खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केला होता. 'उद्धव ठाकरे हे भेटत नाहीत आणि वेळ देत नाहीत,' हेच कारण पुढे करत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे.

Vasant More,  Uddhav Thackeray
Sanjay Raut Controversy : संजय राऊतांवर सामूहिक नाराजीचा स्फोट? ठाकरेंच्या पक्षाला पदाधिकाऱ्यांचा रामराम; 12 जुलैला शिंदे शिवसेनेत मोठा प्रवेश?

ज्येष्ठांची 'मातोश्री' वारी

एकीकडे मोठे नेते पक्ष सोडून जात असताना, दुसरीकडे पुण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख वसंत मोरे यांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुण्याच्या १३० ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी वसंत मोरे यांनी 'मातोश्री दर्शन' यात्रेचे आयोजन केले आहे.

सहा खासदार आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर, येत्या ६ जुलै रोजी हे ज्येष्ठ शिवसैनिक मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. "मरण्यापूर्वी एकदा तरी मातोश्री निवासस्थानी जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे," अशी भावना या ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली होती.

Vasant More,  Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray controversy : बाळासाहेबांच्या वक्तव्याची शिंदेंसमोर खिल्ली; ठाकरेंच्या शिलेदाराच्या संतापाचा स्फोट, म्हणाला, ‘हे तर अमित शाहांचे सैनिक..!’

या भावनेची दखल घेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना या सर्व निष्ठावंतांना मातोश्रीवर घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय उलथापालथीत पुण्यातील ही 'मातोश्री दर्शन' वारी विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com