Prakash Ambedkar : "आता 'वंचित'च्या..."; प्रकृतीत सुधारणा होताच आंबेडकरांचं ICU मधून भावनिक आवाहन

Prakash Ambedkar Health Update : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सध्या रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून पुढील 24 तास त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सध्या रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून पुढील 24 तास त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलं आहे.

अशातच आता त्यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत असून त्यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी पहाटे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Prakash Ambedkar
Devendra Fadnavis : 'या' नेत्यांच्या भेटीसाठी फडणवीस तातडीने पुण्याला रवाना, दौऱ्यामागचं कारण काय?

एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, "मी सध्या 'आयसीयू'मध्ये आहे. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी हे दोन्ही पूर्ण झाल्या आहेत. सध्या डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनसाठी रुग्णालय ठेवलं आहे. सध्या विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत.

निवडणूक अत्यंत महत्त्वाची

ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकांनंतर ओबीसींचं आरक्षण (OBC Reservaion) देखील थांबवण्यात येणार आहे. तसेच एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असून विधानसभेत जर आमदार निवडून आले तर आरक्षणावर होणारे हल्ले थांबवता येतात.

Prakash Ambedkar
Assembly Election 2024 : शिंदेंच्या 'या' उमेदवाराच्या शपथपत्रात 16 प्रकारच्या गंभीर चुका, निवडणूक आयोगाने दिला 24 तासांचा वेळ

त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला आवाहन करतो की, वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजेच गॅस सिलेंडर मागे उभे राहावं आणि आपला अमूल्य मत द्यावं, असं आवाहन त्यांनी या व्हिडिओमधून मतदारांना केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com