OBC Reservation: भाजपच्या महापौरांसह 20 नगरसेवकांचे पद धोक्यात! रवी लांडगे यांच्यासह अनेकांची जात पडताळणी होणार

Pune & PCMC 20 Corporators in Trouble obc Caste Verification:आरक्षित जागांवर निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते.
OBC Reservation latest news updates
OBC Reservation latest news updatesSarkarnama
Published on
Updated on

Pune News Mar 05, 2026: नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील काही उमेदवारांनी ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी असल्याचा दावा करून निवडणूक लढून जिंकली आहे. या बहुतांश उमेदवार हे मराठा समाजातील असून ओबीसी असल्याचा दावा करत निवडून आल्याचा गंभीर आरोप ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी केला आहे.

त्यांनी यासंदर्भात जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापौर रवी लांडगे यांच्यासह 20 नगरसेवकांची जात पडताळणीची सुनावणी उद्या (६ मार्च २०२६) सुरू होत आहे.

आरक्षित जागांवर निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आता 20 जणांच्या जात पडताळणी सुनावणी होणार असेल त्याबाबत नावे निश्चित करण्यात आली आहेत.

याशिवाय आणखी काही नगरसेवकांची नावे लवकरच जोडली जाणार असल्याचं मृणाल ढोले पाटील यांनी सांगितले आहे, तसेच “जवळपास ७०-७५ टक्के ओबीसी आरक्षण मराठा समाजाने गिळंकृत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकार कुठलीही मदत करत नाही, उलट आरक्षण चोरणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहते. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर निश्चित कोर्टापर्यंत जाऊ. काही नगरसेवकांवर अपात्रतेची तांत्रिक तलवार लटकलेली आहे. सुनावणी प्रक्रिया योग्य रितीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा आहे. ओबीसी महासंघ या प्रकरणाची निकटपणे पाहणी करीत आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे लढा देणार असल्याचे ढोले पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

OBC Reservation latest news updates
Vinod Tawde News: अखेर विनोद तावडेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; बिहार, चंदीगड, केरळनंतर 'दिल्ली'चं राजकारण गाजवणार

सुनावणी होणाऱ्या नगरसेवकांची नावे

  1. स्वप्निल दुधाने

  2. विकास साने

  3. हर्षल ढोरे

  4. निवृत्ती बांदल

  5. आरती चोंधे

  6. रेखा देवकर

  7. रत्नमाला सातव

  8. विश्वजीत बारणे

  9. ज्ञानेश्वर जगताप

  10. ज्योती किशोर गोसावी

  11. मनीषा शाम लांडे

  12. वृषाली सुनील कामटे

  13. तानाजी बारणे

  14. भक्ती तुपे

  15. बाबुराव चांदेरे

  16. अर्चना अक्षय करंडे

  17. अनिल सातव

  18. हर्षल रवी टिंगरे

  19. रवी लांडगे

  20. भरत भूषण बराटे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com