Shiv Sena Vs BJP : ठाकरेंच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशानंतर शिंदे सेना आक्रमक; महायुतीत वादाची ठिणगी

Pune PMC Election Mahayuti Conflict PMC Elections 2025 : माजी नगरसेवक जरी भाजपात गेले तरी जागा मात्र आमच्याकडेच राहणार, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
PMC, Devendra Fadnavis, Eknath Shinde
PMC, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पुणे शहरातील पाच माजी नगरसेवकांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार न करता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुण्यात शिंदे सेना आणि भाजपचा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला सर्वत्र गळती लागली असल्याचं पाहायला मिळत असून पुण्यातील ठाकरेंसोबत असलेले विशाल धनवडे , बाळा ओसवाल, संगीता ठोसर,पल्लवी जावळे, प्राची आल्हाट हे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

PMC, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Pune Politics : ...म्हणून पुण्यातील 'या' माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून पळ काढला

या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं.  त्यानुसार प्रत्येक प्रभागवार बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्याचं नाना भानगिरे यांनी सांगितलं.

आगामी महापालिका निवडणुका महायुतीतच लढण्याची आमची तयारी असून पुण्यात किमान 40 ते 50 जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळाव्यात, अशी आमची मागणी असणार आहे. मागील निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन नगरसेवक निवडून आले आहेत, त्या जागा या शिवसेनेच्याच वाट्याला येतील, असेही भानगिरे यांनी स्पष्ट केले.

PMC, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Guardian Minister : अजितदादाच पुण्याचे पालकमंत्री होणार! मंत्र्याने ठणकावून सांगितलं

मागील वेळी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढलेले काही लोक इतर पक्षांमध्ये गेले असले तरी त्या जागा शिवसेनेकडेच राहतील, असा दावा भानगिरे यांनी केला आहे. यामुळे जे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासाठी जागा सोडण्यास शिंदे सेनेने पूर्णपणे नकार दिला आहे.

दुसरीकडे या माजी नगरसेवकांना तिकिटाची हमी देऊनच भाजपमध्ये घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात या जागांवरून शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com